आलात तर तुमच्या सोबत, न आलात तर तुमच्या शिवाय: खासदारांनी वेळ मागितली

आलात तर तुमच्या सोबत, न आलात तर तुमच्या शिवाय: खासदारांनी वेळ मागितली

सांगली : जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती बदलाची प्रक्रिया निर्विघ्न पार पाडावी, यासाठी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी राष्ट्रवादीचे नेते, पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेस नेते, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम (vishwajeet kadam) यांची वेळ मागितली आहे. त्यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ते सहकार्य मागणार आहेत. सोबत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख असणार आहेत. येत्या दोन दिवसांत ही बैठक होईल, अशी अपेक्षा देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल करण्याचा निर्णय जिल्हा कोअर कमिटीने घेतला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. आता जिल्ह्यातील विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी खासदार पाटील आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती निवडीचा कार्यक्रम लागला तर भाजपकडे सध्या पुरेसे संख्याबळ नाही. निवडणूक लागली आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ही राज्यातील महाविकास आघाडी एकत्र झाली तर भाजपचे मनसुबे धुळीला मिळू शकतात. त्यामुळे सध्या बदल करायचाच झाला तर तो जयंत पाटील, विश्‍वजीत कदम यांनी शब्द दिल्यावर शक्य आहे. त्यामुळे आधी या दोन नेत्यांची आणि सोबत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची वेळ मागण्यात आली आहे.

आलात तर तुमच्या सोबत, न आलात तर तुमच्या शिवाय: खासदारांनी वेळ मागितली
सुवर्णमयी इतिहासातील पेशवेकाळाचा साक्षीदार मोजतोय अखेरची घटका

पृथ्वीराज देशमुख म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र ते करताना सावध पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधी पक्षांशी चर्चा तितकीच महत्वाची आहे. खासदार संजय पाटील यांनी विरोधी पक्षांकडे वेळ मागितला आहे. तो मिळाला की चर्चा होईल. त्यात काय होतेय, हे पाहून पुढील निर्णय आम्ही घेऊ.’’

बिनविरोध झाल्यास...

जिल्हा परिषदेतील बदल बिनविरोध झाला तर भाजपला सहयोगी पक्ष, संघटना, गट, नेत्यांची फारशी अडचण होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, न आलात तर तुमच्या शिवाय, अशी साधारण भूमिका घेता येईल. त्यामुळे आधी विरोधकांकडून बिनविरोधचा शब्द घेण्याचा प्रयत्न खासदार संजय पाटील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com