जयकुमार गाेरेंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांचा चलाे भाजपाचा नारा

रुपेश कदम
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

उद्या (शनिवार) मुंबईला जाणार असून महत्वाचे कार्यकर्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समर्थकांनी दिली.

दहिवडी : माणचे काॅंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज (शुक्रवार) आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

माढा मतदारसंघात लाेकसभा निवडणुकीत गाेरेंनी भाजपाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचा जाहीररित्या प्रचार केला हाेता. त्यानंतर गोरे हे भाजपमध्ये जाणार या चर्चांना वेग आला होता. परंतू अनेकदा आमदार गोरे त्याचे खंडन करत होते.

आज (शुक्रवार) आमदार गोरेंनी राजीनामा दिल्याने सर्व चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे. आमदार गोरे एक सप्टेंबरला सोलापूर येथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश करतील. त्यामुळे आमदार गोरे हेच भाजपचे माण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असे ठामपणे समर्थकांकडून सांगितले जात आहे.

आमदार गाेरेंच्या राजीनाम्यानंतर समर्थकांनी माण मतदारसंघात चलाे भाजपाचा नारा दिला. उद्या (शनिवार) मुंबईला जाणार असून महत्वाचे कार्यकर्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समर्थकांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaykumar Gore followers says Chalo BJP