जेईई, नीट परीक्षांचे मोफत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सातारा - इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट या प्रवेश परीक्षांची पुण्यातील दक्षणा फाउंडेशनच्या माध्यमातून एक वर्ष निःशुल्क तयारी करून घेतली जाते.

देशभरातून या संस्थेत विद्यार्थी येतात; परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे राज्य शासनाने संस्थेशी सामंजस्य करार करून राज्यातील शाळांमधून विद्यार्थी निवडण्याची संकल्पना योजली आहे. 

या संस्थेने राज्यभरातील शाळांतून दक्षणा प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थी निवडावेत, असे सूचित करण्यात आले आहे. या फाउंडेशनद्वारे ही परीक्षा जानेवारीत घेण्यात येईल. पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापर्यंत आहे व ज्यांना दहावीत गणित व विज्ञान या विषयांत ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आहेत, असे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतील. जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून यादी प्राप्त झाल्यानंतर फाउंडेशनकडून निवड यादी प्रकाशित करून विद्यार्थ्यांना http://www.dakshanana.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येईल. प्रवेश परीक्षेसाठी चाचणी केंद्रात कमीतकमी १०० विद्यार्थी असतील. चाचणी केंद्रावर पर्यवेक्षक, प्रवेश परीक्षेसाठी लागणारे परीक्षा साहित्य हे फाउंडेशनतर्फे पुरविण्यात येईल. शाळांतून नामनिर्देशित विद्यार्थ्यांची यादी jdst@dakshana.org या ई- मेल वर पाठवावी. या उपक्रमाबाबत माहितीसाठी (७७९८७८६४०५) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

एक वर्षाचा निवासी कार्यक्रम
या परीक्षेसाठी शासकीय शाळा, तसेच १०० टक्के शासकीय अनुदानित खासगी शाळेतील बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थीच बसू शकतील. बारावी विज्ञान शाखेची परीक्षा झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम एक वर्षासाठी निवासी आहे. विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था दक्षणा फाउंडेशनद्वारे करण्यात येईल.

Web Title: JEE, NEET Exam Free Guidance