सातारा: भाविकांची जीप दरीत कोसळली; तीन ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

डोंगरमाथ्यावरील श्री भोजलिंग देवस्थानात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या जीपला आज (शनिवार) अपघात झाला. जांभुळकणीकडील डोंगर उतारावर चालकाचा ताबा सुटून जीप दरीत कोसळली. यात किमान तीन ते चार जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

सातारा : डोंगरमाथ्यावरील श्री भोजलिंग देवस्थानात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या जीपला आज (शनिवार) अपघात झाला. जांभुळकणीकडील डोंगर उतारावर चालकाचा ताबा सुटून जीप दरीत कोसळली. यात किमान तीन ते चार जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

म्हसवडपासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीकच्या डोंगरमाथ्यावर श्री भोजलिंग देवस्थान आहे. येथे दर्शनासाठी काही भाविक जीपमधून आले होते. मंदिराकडे जाण्यासाठी जांभुळणी आणि वळई गावाकडून असे दोन मार्ग आहेत. 

त्यापैकी जांभुळणीकडील डोंगर उतारावरील चालकाचा ताबा सुटला आणि जीप किमान दोनशे फूट दरीत कोसळली. या जीपमध्ये दहा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Jeep carrying 10 devotees near Satara fell down in valley

टॅग्स