जेऊर जिल्हा परिषद कन्नड शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र कार्यांवित

राजशेखर चौधरी
बुधवार, 27 जून 2018

अक्कलकोट - जेऊर ता. अक्कलकोट येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने शालेय मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी १५ लाख रुपये किमतीचे नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र कार्यांवित करण्यात आले आहे. यामुळे जेऊरमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा विज्ञान प्रात्यक्षिक अध्ययन आणि अध्यापन सुलभ आणि सखोल होण्यास मदत होणार आहे. 

अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी कन्नड शाळांचा पट कमी होत असताना जेऊर येथील मुख्याध्यापक राजकुमार अमोगी आणि त्यांच्या होतकरू शिक्षकांनी मार्च महिन्यापासूनच पाहिलीसाठी पटनोंदणी करतात. त्यामुळे आज १४ शिक्षकांसह ४२७ विद्यार्थी कन्नड माध्यमात अध्ययन करीत आहेत. 

त्यामुळे या शाळेस अनोखे असे 'नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र'  मंजूर झाले आहे. आणि सर्व साहित्य विज्ञान केंद्रात बसविण्यात आले आहेत. या विज्ञान केंद्रात १ ली ते ७ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित एकूण ५२० साहित्य असून एकूण तिन्ही शास्त्रातील ३४८ प्रयोग त्याद्वारे विद्यार्थ्यांना दाखविता येणार आहेत. या शाळेतील विद्यार्थी नुसते पुस्तकी ज्ञान करण्यापेक्षा प्रत्यक्ष साहित्य हाताळून संबंधित भागाचा सखोल माहिती आणि त्यातले बारकावे समजण्यास मदत होणार आहे. 

या केंद्रात चुंबकीय क्षेत्र, जादूचा पाण्याचा नळ, विद्युत वाहक व विद्युत रोधक, कृत्रिम उपग्रह, पवनचक्की, रेडिओमीटर, विलक्षण चेंडू, पायथागोरस सिद्धांत, मेंदूची रचना, सूक्ष्मदर्शक यंत्र, विद्युत चक्रव्यूह, मानवी डोळ्यांची रचना यासह ३४८ प्रयोग त्याठिकाणी शिकविले जाणार आहेत. येत्या काही दिवसात शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले की प्रत्यक्ष पूर्ण अध्यपनास सुरुवात केले जाणार आहे.

Web Title: Jeur Zilla Parish Kannada School, Innovative Science Center