कोल्हापुरातील सीबीएसमधून महिलेचे चार तोळे दागिने पळविले

कोल्हापुरातील सीबीएसमधून महिलेचे  चार तोळे दागिने पळविले

कोल्हापूर - प्रवासी महिलेच्या पर्समधील चार तोळे दागिन्यांसह रोकड असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. आज भरदुपारी मध्यवर्ती बस स्थानकात ही घटना घडली. सविता शिवाजी कुंभार (वय ३६, तारदाळ ता. हातकणंगले) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

माहिती अशी, सविता कुंभार आज मुलगा विशालसह सरवडे (ता. राधानगरी) येथे माहेरी यात्रेसाठी जात होत्या. दुपारी त्या कोल्हापूर-इचलकरंजी एसटीने मध्यवर्ती बस स्थानकात आल्या. फलाटावर कोल्हापूर- गारगोटी बस लागली. त्या बसमध्ये चढल्या. बसल्यानंतर पाण्याची बाटली काढण्यासाठी त्यांनी पर्स उघडली, यावेळी त्यांना पर्समधील कप्प्याची चेन उघडी दिसली. पर्समध्ये त्यांनी तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे नेकलेस व २८०० रुपये ठेवले होते. दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या लगेच बसमधून उतरल्या व त्यांनी पती व नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ बस स्थानकात जाऊन चोरट्यांचा शोध घेतला; मात्र संशयित पसार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com