जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हालगर्जीपणा समोर

jilha parishad school education department careless
jilha parishad school education department careless

मंगळवेढा - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हालगर्जीपणामुळे तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांची चालू शैक्षणिक वर्षात 77 जागा रिक्त ठेवून तालुक्यातील विशेषतः दक्षिण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचे तीन तेरा वाजवण्याचा प्रताप शिक्षण विभागाने केला आहे.

तालुक्यामध्ये 697 पदे मंजूर असून सध्या इतकी पदे कार्यरत आहेत. साधारणतः तालुक्यात 620 पदे सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक व उर्दु शिक्षक अशी पदे रिक्त आहेत यापैकी दोन शिक्षणासह मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रशासकीय बदल्याला स्थिगिती व आंतरजिल्हा बदलीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवल्याने तालुक्यातील शिक्षकांची दैना झाली. या रिक्त पदाबाबत शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले नाही. दक्षिण भागातील सलगर बु व भोसे, नंदेश्‍वर या भागात शिक्षण विभागाची मर्जी नसल्याने या भागात परिस्थितीच्या दुष्काळाबरोबर शिक्षणाचाही दुष्काळ ठेवला. सलगर बु. शाळेला पहिल्या दिवशी कुलुप ठोकण्याचे आंदोलन केल्यावर शेजारच्या शाळेतले शिक्षक देऊन मुळ शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक अंधार निर्माण केला. सध्या काही शिक्षकांचे वास्तव्य मंगळवेढयात असल्याने ते तालुक्याच्या जवळची शाळा निवडतात. पण सिमावर्ती भागात कोणच तयार नसतात. रिक्त पदाचा परिणाम दक्षिण भागातील शिक्षणावर होत आहे. व्दिशिक्षकी शाळा एका शिक्षकावर अवलंबून असल्याने शालेय पोषण आहार, गणवेश, बँक खाते, डिजिटल शाळा, शिष्यवृत्ती माहिती ऑनलाईन करुन शिक्षणाचे काम करताना नाकीनव येत आहे. शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन वर्षभर शिक्षकांची पदे रिक्त ठेवून शैक्षणिक आयुष्य उधवस्त करित असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे.

शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता फक्त शिकवण्याचे काम दयावे. जि. प. च्या वर्ग तीनच्या विनंती व प्रशासकीय बदल्याचे पाच टक्के धोरण शिक्षकातही असावे. पदोन्वती व रिक्त पदा प्रश्‍न मार्गी लागल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, असा सल्ला शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय चेळेकर यांनी दिला. तर आ. भारत भालके म्हणाले, शैक्षणिक गुणवत्ता अभिमानास्पद असल्याने गट शिक्षण अधिकाऱ्यासह व शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, म्हणून यापूर्वीच पत्रव्यवहारही केला. रिक्त पदे तातडीने भरून गुणवत्ता कायम राहिल याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com