इचलकरंजी वारणा योजनेबाबत 22 रोजी मंत्रालयात संयुक्त बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला विरोध होत असल्याने याबाबत मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी विरोधी व कृती समितीची एकत्रित व्यापक बैठक मंगळवार दिनांक 22 मे 2018 रोजी दुपारी 12 वाजता मंत्रालयात बोलवली आहे. 

इचलकरंजी - शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला विरोध होत असल्याने याबाबत मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी विरोधी व कृती समितीची एकत्रित व्यापक बैठक मंगळवार दिनांक 22 मे 2018 रोजी दुपारी 12 वाजता मंत्रालयात बोलवली आहे. 

वारणा योजनेच्या समर्थनासाठी इचलकरंजी येथे दिनांक 14 मे रोजी सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर चक्री उपोषण आंदोलनाची सुरवात करण्यात आली आहे. आज आमदार सुरेश हाळवणकर यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांची भेट घेतली. वारणा नदीतून इचलकरंजीला पाणी पुरवठा झाल्यास झाल्यास शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील वारणा नदी काठावरील गावात पाण्याची टंचाई भासेल असा अपप्रचार करण्यात येत असल्यामुळे गैरसमजातून विरोध वाढत आहे. म्हणून योजनेला विरोध करणाऱ्या वारणा योजना विरोधी समिती व इचलकरंजीतील वारणा योजना कृती समिती यांची एकत्रित व्यापक बैठक लोकप्रतिनिधींसह आयोजित करून पदाधिकारी व जनतेचे झालेले गैरसमज दूर करण्याची विनंती केली.

आंदोलनाची दखल घेत ही विनंती मान्य करून बबनराव लोणीकर यांनी बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले. या बैठकीस चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, वारणा विरोधी कृती समितीचे मार्गदर्शक एन. डी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगरविकास आणि पाणी पुरवठा विभाग व पाटबंधारे विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्याधिकारी इचलकरंजी नगरपालिका, तसेच विरोधी व कृती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title: Joint meeting in the Ministry purpose of ichalkaranji water supply issue