जोतिबा डोंगर गुलालात न्हाला.. 

निवास मोटे
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जोतिबा डोंगर - चैत्रातील उन्हाचा मोठा तडाखा ..घामाने चिंब होऊन गुलालाने न्हाहालेले लाखो  भाविक.. देहभान विसरून सासन काठया घेऊन नाचणारी तरुणाई .. आकाशाला भिडलेल्या हाजारो रंगी बेरंगी सासन काठी .. डोंगरावर घुमलेला  हलगी पिपाणी सनई ढोल ताशे व्हलेर बाजा यांचा सुर .. मंदिरात झालेली गुलाल खोबऱ्याची मोठी उधळण .. गुलालात न्हाहालेला आख्खा जोतिबाचा डोंगर .. आणि जोतिबाच्या नावान चांगभल ..यमाईदेवी ,चोपडाई देवी, नंदी , महादेव, काळभैरवाच्या नावान चांगभल चा जयघोष अशा वातावरणात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ( जोतिबा डोंगर ता .पन्हाळा ) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा साजरी झाली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक, आंधप्रदेश गुजरात या राज्यातील नऊ लाख भाविक जोतिबाच्या चरणी लीन झाले. डोंगरावर काल पासूनच लाखो भाविक दाखल झाले. रात्रभर ही झुंडी येत राहिल्या. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूक काळात ही डोंगर हाऊस फूल झाला. यंदा निवडणूकीचा हंगाम सुरु असल्याने डोंगरावर गर्दी होणार की नाही याबाबत संभ्रामवस्था होती. परंतू यंदा ही डोंगरावर गर्दीचा उच्चांक झाला. पहाटे चार पासूनच दक्षिण दरवाजा पर्यंत रांगा लागल्या.

आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटे तीनलाच घंटानाद झाला. त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पहाटे श्रीची   पाद्य पूजा, काकड आरती, मुख मार्जन हे विधी झाले. पहाटे पाच वाजता पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय महाभिषेक झाला.

यावेळी पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील, देवस्थान समितीचे अधिक्षक महादेव दिंडे, देवस्थान समितीचे सहाय्यक सचिव शिवाजी साळवी, सुदेश देशपांडे उपस्थित होते.

आज सकाळी साडेआठ वाजता जोतिबा देवाची चैत्र यात्रेनिमित्त राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा तुषार झुगार, अंकुश दादर्ण, दहा गावकर यांनी बांधली. यंदा प्रथमच दुपारी बारा वाजता सासन काठी मिरवणूकीस सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते मानाच्या सासन काठीचे पुजन झाले. आमदार सतेज पाटील, सत्यजीत पाटील सरूडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व महादेव दिंडे, देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सासनकाठी पुजनावेळी चांगभलचा मोठा जयघोष झाला. त्यानंतर हलगी, पिपाणी, ढोल, व्हलेर बाजा यांच्या सुरावर सासन काठ्या नाचविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मंदिर परिसर दणाणून गेला. सर्व मानाच्या काठ्या विविध रंगी फुलांनी सजविल्या होत्या. त्या क्रमाक्रमानुसार मिरवणूकीत सहभागी होत होत्या . मिरवणूकीत पहिला नंबरचा मान पाडळी ( जि . सातारा ) दुसरा क्रमांक विहे ( ता . पाटण ) त्यांनंतर कसबे डिग्रज (ता. मिरज ) हिम्मत बहादूर चव्हाण सरकार निगवे दुमाला ( ता करवीर ) कसबा सांगाव ( ता कागल ) किवळ( ता . कराड ) छत्रपती करवीर , कवठेगुलंद ( ता  शिरोळ ) मनपाडळे, दरवेश पाडळी (ता हातकणंगले ) सांगलीवाडी , फाळकेवाडी , विठ्ठलवाडी यांच्यासह मानाच्या सर्व सासनकाठया सवाद्य मिरवणुकीने मुळमाया यमाई मंदिराकडे गेल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचे साकडे 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज जोतिबा चरणी साकडे घातले की , यात्रा सुरळीतपणे पार पडू दे..कोणावर ही यात्रेत संकट येऊ नये आलेला भाविक भक्त आपआपल्या घरी सुखरूप जाऊ दे

सासनकाठी मिरवणूक बारालाच सुरू 

यंदा शासकीय यंत्रणेने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुपारी बाराला सासनकाठी मिरवणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज बरोबर दुपारी बारा वाजता ही मिरवणूक सुरू झाली.

Web Title: Jotiba Chaitra Yatra