जोतिबा डोंगरावर आज नगर प्रदक्षिणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त नगर प्रदक्षिणा निघणार आहे. 

या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सज्ज आहे. सोहळ्यासाठी दीड लाख भाविक सहभागी होतील. त्या दृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन केल्याचे कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले.

सोमवारी (ता. २७) सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी ९ ते सांयकाळी ७ या वेळेत ही नगर प्रदक्षिणा होईल. ही प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर चारीधाम यात्रा पूर्ण केल्याचे पुण्य पदरी पडते, असे भाविक मानतात. उद्या मुख्य मंदिरात वीणा पूजन होईल. यावेळी पुजारी, ग्रामस्थ, गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्वनाथ डवरी उपस्थित असतील. सकाळी नऊ वाजता मंदिर परिसरात अखंड असा चांगभलंचा जयघोष झाल्यानंतर मुख्य मंदिरातून दक्षिण दरवाजातून नगर प्रदक्षिणा सोहळा मार्गस्थ होईल. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी भाविकांसाठी खिचडी, चहा, दूध, राजगिरा लाडू, केळी व फळवाटप भाविक करणार आहेत.

Web Title: Jotiba Dongar nagar Pradakshina