जोतिबा डोंगरावर दुसऱ्या पाकाळणीनिमित्त भाविकांची गर्दी

जोतिबा डोंगरावर दुसऱ्या पाकाळणीनिमित्त भाविकांची गर्दी

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं.  यमाईदेवी, नंदी, महादेव चोपदाईदेवी, काळभैरवाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथे आज दुसरा पाकाळणी रविवार भक्तिमय वातावरणात साजरा झाला.

या सोहळ्याच्या निमित्ताने आज जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली. भाविकांनी आज सासनकाठी मंदिर शिखर व पालखीवर गुलालाची भव्य उधळण केली. जोतिबाचा डोंगर आज ही गुलालात न्हावून गेला. आज ठाकरे -मिटके गल्लीच्या टोकापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. 

दुसरा पाकाळणी रविवार असल्याने शनिवारपासून पुजाऱ्यांच्या घरी भाविकांनी गर्दी केली. सकाळी मंदिरात काकड आरती व मंगल पाठ झाले. त्यानंतर केदार स्तोत्र केदार महिमा या विधींचे पठण झाले. सकाळी दहा वाजता जोतिबा देवाची सालंकृत अशी महापूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता उंट घोडा व सर्व लवाजमासह धुपारती सोहळा झाला.

उन्हात सासनकाठी  नाचविण्याचा आनंद..
ज्या सासन काठया चैत्र यात्रेत डोंगरावर आल्या नाहीत . त्या आज दुसऱ्या पाकाळणी निमित्त डोंगरावर दाखल झाल्या. यामध्ये कर्नाटक, सांगली, सातारा या भागातील काही सासन काठयांचा समावेश होता. धुपारतीवेळी या सासन काठयांची मिरवणूक निघाली. भाविकांनी भर उन्हात सासनकाठी नाचविण्याचा आनंद घेतला. यावेळी गुलाल खोबऱ्याची उधळण झाली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com