कंटेंट निर्माण करणाऱ्या पत्रकारांची गरज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

कोल्हापूर - ""वाचकांना, श्रोत्यांना, दर्शकांना हवे असलेले, सर्व प्रकारच्या व्यक्तिगत गरजांनुरुप कंटेंट निर्माण करणारे पत्रकार माध्यम क्षेत्राला हवे आहेत. सिटिझन जर्नालिझम हे पत्रकारितेचे भवितव्य असून, पत्रकारितेचा प्रवास आता एडिटिंग ते क्‍युरेटिंग असा होणार आहे,'' असे मत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर - ""वाचकांना, श्रोत्यांना, दर्शकांना हवे असलेले, सर्व प्रकारच्या व्यक्तिगत गरजांनुरुप कंटेंट निर्माण करणारे पत्रकार माध्यम क्षेत्राला हवे आहेत. सिटिझन जर्नालिझम हे पत्रकारितेचे भवितव्य असून, पत्रकारितेचा प्रवास आता एडिटिंग ते क्‍युरेटिंग असा होणार आहे,'' असे मत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. 

शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग, एम.ए. मास कम्युनिकेशन विभाग आणि कोल्हापूरच्या विभागीय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त झालेल्या संपादक परिषदेत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर अध्यक्षस्थानी होते. 

श्री. पवार यांनी वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या गतीने सुरू असलेल्या बदलांचा वेध घेतला. ते म्हणाले, ""पारंपरिक विचारांनुसार वृत्तपत्रांनी एखाद्या विषयाच्या सर्व बाजू द्याव्यात असा आग्रह असतो. नकारात्मक बातम्यांतही मूल्य असते, हे विसरता कामा नये. नवमाध्यमांच्या गतिमान आगमनामुळे यामधील ऑब्जेक्‍टिव्हिटी संपते आहे. सद्यःस्थितीत पत्रकारांनी विवेकपूर्ण भूमिका घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. ज्याचे अस्तित्व गुगलवर आहे, तोच जिवंत असे मानण्याचा हा कालखंड आहे. नवमाध्यमांमुळे माध्यमांकडे पाहण्याचा, ग्रहण करण्याचा दृष्टिकोन साफ बदलला आहे. बातमी ब्रेक करण्याचे सूत्र आता समाजमाध्यमांच्या हाती आले आहे. तशात विध्वंसक तंत्रज्ञानामुळे (डिसरप्टिव्ह टेक्‍नॉलॉजी) जगण्याची सारी अंगे बदलून गेली आहेत. दाओस इथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीबाबत भाष्य करण्यात आले. "नेटवर्किंग ऑर नॉट वर्किंग' हे या क्रांतीचे सूत्र असणार आहे.'' 

ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, जयसिंग पाटील, चारुदत्त जोशी व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळित यांनी मनोगत व्यक्त केले. अधिविभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक केले. शीतल काळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष चव्हाण यांनी आभार मानले. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, रावसाहेब पुजारी, डॉ. राजेंद्र पारिजात, डॉ. श्रीहरी देशपांडे, डॉ. सुमेधा साळुंखे उपस्थित होते. 

समृद्ध वारशाची पत्रकारांना जाणीव... 
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ""कोल्हापूरची पत्रकारिता ही सकारात्मक दिशेने जाणारी आहे. कोल्हापूरला एक समृद्ध वारसा लाभला आहे. या वारशाची जाणीव असलेला इथला प्रत्येक पत्रकार हा एक स्वतंत्र विचारमंच आहे. ज्याला समाजाच्या प्रश्‍नांची जाण आहे. ते सोडविण्याची तळमळ आहे. ही सकारात्मकता त्यांच्या मनात रुजलेली आहे. ती त्यांनी सदोदित जोपासावी.'' नकारात्मक पत्रकारिता ही अल्पायुषी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Journalists create content