esakal | भाकरीच्या चंद्रावर अवकाळीचा डाग ; यंदा ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्‍यता

बोलून बातमी शोधा

jowar crop on 14 thousand hectares in nipani but atmosphere effect on crop}

उत्पादन घटून ज्वारीची किंमत वाढून यंदा गरिबांची भाकरी महाग होण्याची चिन्हे आहेत. 

भाकरीच्या चंद्रावर अवकाळीचा डाग ; यंदा ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्‍यता
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : तालुक्‍यात यंदाच्या रब्बी हंगामात 14 हजार 664 हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. परंतु हवामानातील सततच्या बदलासह अवकाळीच्या फटक्‍यामुळे हक्काचे उत्पादन मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे उत्पादन घटून ज्वारीची किंमत वाढून यंदा गरिबांची भाकरी महाग होण्याची चिन्हे आहेत. 

कृषी खात्याचे निपाणी तालुका अधिकारी पुरुषोत्तम पिराजे यांनी सांगितले की, तालुक्‍यात 1 हजार 884 हेक्‍टरवर गव्हाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुभत्या जनावरांची संख्या जास्त असल्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी मका पीक उत्पादन व चाऱ्यासाठी घेतले जाते. त्याचे क्षेत्र सुमारे 230 हेक्‍टर आहे. तसेच हरभरा 1 हजार 693 हेक्‍टरवर आहे. पूर्व हंगामी, आडसाली, खोडवा असा एकूण 15 हजार 200 हेक्‍टरवर ऊस असल्याची नोंद तालुका कृषी कार्यालयात आहे. उसाला चांगला दर मिळत असल्याने निपाणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी गहू पीक यंदा कमी प्रमाणात घेतले आहे. वातावरणाचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्‍यता असल्याने चिंता लागली आहे.

हेही वाचा - रामफळाला बाजारपेठ आहे, परंतु लागवडीकडे मात्र दुर्लक्ष -

ज्वारी काळवंडली 

डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणच्या ज्वारीच्या क्षेत्रातील पीक काळवंडले आहे. तर काही ठिकाणचे ज्वारी पीक पडल्याने दाणे भरण्यास अडचण झाली. परिणामी शेतकरी केवळ चाऱ्यासाठीच त्याचा वापर करीत आहेत.