ऐन हिवाळ्यातही येथे घेतला जातोय पोहण्याचा आनंद (Video)

किरण चव्हाण
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

माझ्या शेतामध्ये सिमेंट कॉंक्रिटचा मोठा हौद बांधला आहे. त्यामध्ये दररोज विंधन विहिरीचे पाणी सोडले जाते. लोकांना पोहण्याचा व्यायाम करता यावा. यासाठी हा मोठा हौद मी विनामोबदला पोहण्यासाठी सर्वांसाठी खुला ठेवला आहे. 
- शहाजी चवरे, माढा

माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील अनेक नागरिक सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने मॉर्निंग वॉकसाठी सकाळी घराबाहेर पडताना दिसत असून मॉर्निंग वॉक नियमित जीवनशैलीचा भाग व्हावे, अशी अपेक्षा डॉक्‍टरांकडून व्यक्त केली जात आहे. अशा थंडीत सुद्धा अनेकजण पोहण्याचा आनंद घेत आहेत. 

तरुणांची संख्या वाढतेय 
हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू मानला जातो आणि या ऋतूमध्ये तरुण, युवक- युवती यांचाही मॉर्निंग वॉक करण्याकडे कल वाढतो. त्यामुळे सहाजिकच सध्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून व शहरातून सध्या मॉर्निंग करण्यासाठी युवक-युवती, वृद्ध यांची संख्या वरचेवर वाढत आहे. आरोग्याबाबत जागृतता वाढत चालल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र केवळ हिवाळ्यातच मॉर्निंग करायचं आणि इतर ऋतूत ते टाळायचं असे होताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसते. मात्र डॉक्‍टरांनी चांगल्या आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक हा नियमित जीवनशैलीचा भाग करून घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा : मोदींची ऑफर नाकरली

मॉर्निंग वॉकला जाताना काय घ्यावी काळजी? 

  •  मॉर्निंग वॉकला जाताना आपण रस्त्याच्या एका बाजूने चालावे. 
  • रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांपासून अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • शक्‍यतो मोकळ्या मैदानामध्ये मॉर्निंग वॉक करावे.
  • मॉर्निंग वॉकला जाताना शक्‍यतो बुटांचा वापर करावा. 
  • मॉर्निंग वॉक वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. 
हेही वाचा : जाणून घ्या, सोलापूरात का येतोय सर्वाधिक कांदा

मॉर्निंग वॉकबद्दल डॉक्‍टरांची मते 
मॉर्निंग वॉकमुळे रक्तदाब, मधुमेह व इतर आजारांचा त्रास कमी होण्यास मदत होते. दररोज किमान 45 मिनिटे चालावे. त्यात सुरवातीचे व शेवटचे चार-पाच मिनिटे सावकाश चालावे. मधल्या काळामध्ये आपल्या शरीर प्रकृतीनुसार चालण्याचा वेग ठेवावा. 
- डॉ. विनोद शहा, माढा 

मॉर्निंग वॉकमुळे वेगवेगळे आजार बरे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपले मानसिक व सामाजिक स्वास्थ्यही मॉर्निंग वॉकमुळे चांगले राहण्यास मदत होते. 
- डॉ. सोमेश्‍वर टोंगळे, माढा 

आजार बरे होतात 
रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजार बरे करण्यात औषधांबरोबर मॉर्निंग वॉकचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे काही आजार बरे करण्यासाठी व काही आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक काळजी म्हणून प्रत्येकाने मॉर्निंग वॉक करावे. 
- डॉ. प्रकाश कुर्डे, माढा 

महाराष्ट्र

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The joy of swimming in winter