न्यायाधीशाला सक्तीने केले सेवानिवृत्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

उच्च न्यायालयाकडून याबाबतचा ईमेल बुधवारी जिल्हा न्यायाधीशांना पाठवण्यात आला आहे. सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे कारण समजू शकले नाही.

सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पी. बी. मोरे यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाकडून याबाबतचा ईमेल बुधवारी जिल्हा न्यायाधीशांना पाठवण्यात आला आहे. सक्तीने सेवानिवृत्त करण्याचे कारण समजू शकले नाही. कामाकाजातील त्रुटी किंवा तक्रारीमुळे ही कारवाई केली असण्याची शक्यता आहे.

दिवाणी न्यायाधीश मोरे हे गेल्या तीन वर्षांपासून सोलापुरात कार्यरत होते. त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आल्याने जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली आहे.

Web Title: judge retirement in Solapur