लाखभर भाविकांनी घेतले जोतिबा दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ.. यमाईदेवी, चोपडाईदेवी, नंदी, महादेव, बद्रिकेदार, काळभैरवाच्या नावानं चांगभलंऽऽ...च्या जयघोषात व मंगलमय वातावरणात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिर्लिंग मंदिरात आज सकाळी 6.33 मिनिटांनी श्री केदारनाथ प्रकटदिन सोहळा झाला. यासाठी राज्यभरातून लाखभर भाविक दर्शनासठी आले. रविवार व श्रींचा प्रकटदिन सोहळा असा योग बऱ्याच वर्षांनी आल्याने भाविकांनी अगदी भर उन्हातून श्रीचे दर्शन घेतले. सकाळी मंदिरात दंड स्नान, दीपोत्सव, पाद्यपूजा, मुखमार्जन, काकाडारती, गणपती पूजन, घंटापूजन व ध्वजारोहन आदी विधी झाले.

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ.. यमाईदेवी, चोपडाईदेवी, नंदी, महादेव, बद्रिकेदार, काळभैरवाच्या नावानं चांगभलंऽऽ...च्या जयघोषात व मंगलमय वातावरणात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिर्लिंग मंदिरात आज सकाळी 6.33 मिनिटांनी श्री केदारनाथ प्रकटदिन सोहळा झाला. यासाठी राज्यभरातून लाखभर भाविक दर्शनासठी आले. रविवार व श्रींचा प्रकटदिन सोहळा असा योग बऱ्याच वर्षांनी आल्याने भाविकांनी अगदी भर उन्हातून श्रीचे दर्शन घेतले. सकाळी मंदिरात दंड स्नान, दीपोत्सव, पाद्यपूजा, मुखमार्जन, काकाडारती, गणपती पूजन, घंटापूजन व ध्वजारोहन आदी विधी झाले. सकाळी 6.33 वाजता चांगलभलंच्या जयघोषात श्रीचा प्रकट सोहळ्यात गुलाल व पुष्पवृष्टी केली. 

सकाळी आठला श्री केदारनाथांसह सर्व अष्टभैरवांना लघुरुद्राभिषेक घातला व श्रीची सालंकृत महापूजा बांधली. ही पूजा रामचंद्र भिवदर्णे, चंद्रकांत भिवदर्णे, नवनाथ भिवदर्णे, दीपक भिवदर्णे, जगन्नाथ भिवदर्णे, अशोक भिवदर्णे, शुभाष भिवदर्णे, देवदास भिवदर्णे यांनी बांधली. सकाळी नऊ ते बारा दरम्यान केदार विश्‍वशांती यज्ञ झाला. दुपारी बाराला उंट, घोड्यांसह धुपारती सोहळा झाला. 

या वेळी गुलाल-खोबऱ्याची उधळण झाली. एक वाजता उमाकांत राणिंगा, ऍड. प्रसन्न मालेकर यांच्या श्री नाथ रहस्य पंचक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सायंकाळी सहाला गजानन डवरी, मच्छिंद्र डवरी, विश्‍वनाथ डवरी यांची पारंपरिक गीते झाली. रात्री भजन व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. दरम्यान, दुपारी बारा ते रात्री उशिरापर्यंत महाप्रसादासाठी भाविकांची झुंबड उडाली. श्री केदारनाथ प्रकटदिन सोहळ्यास पन्हाळ्याचे तहसीलदार, कोडोलीचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी हजेरी लावली. हा सोहळा पार पाडण्यासाठी श्री केदारनाथ चॅरिटेबल ट्रस्ट, ज्योतिर्लिंग पुजारी, ग्रामस्थ, अमर झुगर यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Jyotiba darshan