जोतिबा मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

कोल्हापूर - जोतिबा डोंगरावरील सासनकाठी मार्गावरील विद्युत वाहिन्यांचा अडथळा दूर करावा, या वाहिन्या भूमिगत असाव्यात, याशिवाय डोंगरावर येणाऱ्या भाविकांना प्रशस्त यात्री निवास असावे, या सर्व बाबींचा समावेश नवीन आराखड्यात केला आहे. हा आराखडा मंगळवारी (ता. १४) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत सादर करून त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी आज याचे सचित्र सादरीकरण केले. 

जोतिबा मंदिर विकासासाठी १५५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याचा आराखडा कसा आहे किंवा तो कसा राबवावा, याबाबत मुंबई येथे मंगळवारी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आराखड्यातील बदलाबाबत चर्चा झाली. राज्याच्या मुख्य सचिवांच्या समितीने आराखड्यात बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये नवीन कामे समाविष्ट करण्याबाबत आवाहन केले होते. दरम्यान, गेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे दोन बदल केले आहेत. हा आराखडा परिपूर्ण व्हावा, यासाठी काळजी घेण्यात आली आहे. दर्शन मंडप, पालखी सोहळ्यासाठी सेंट्रल प्लाझा, टॉयलेट कॉम्प्लेक्‍स, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापणाबाबतही विशेष निधी प्रस्तावित केला आहे. मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. डॉ. कुणाल खेमणार, शिवाजी जाधव, संगीता खाडे, बी. एन. पाटील, विजय पोवार, प्रियदर्शनी मोरे, राजेंद्र सावंत, निशांत पाटील उपस्थित होते.

Web Title: Jyotiba temple development plan presentation