कास पठारावर फुलांचा नजराणा! 

कास पठारावर फुलांचा नजराणा! 

कास - जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास पठारावर सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांनी भेट देवून विविधरंगी फुलांचा नजराणा अनुभवला. 

सध्या पावसाने उघडीप दिल्याने कास पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आहे. अनेक फुलांनी पठार बहरले आहे. त्यामध्ये सर्वांत जास्त गुलाबी तेरडा, पिवळा मिकी माउस, निळी सितेची आसव, पांढरे गेंद या फुलांचे गुच्छच्या गुच्छ दिसत आहेत. काही ठिकाणी ही सर्व फुले एकत्र असल्याने बहुरंगी छटा पाहायला मिळत आहेत. शनिवारी व रविवारी ऑनलाइन बुकिंगचे सहा हजार पर्यटकांचे पूर्ण बुकिंग होवूनही ऑफलाइनचेही पर्यटक तेवढेच आल्याने पठारावर प्रचंड गर्दी झाली होती. घाटाई फाटा येथे असणारे वाहनतळही फुल्ल झाले होते. दोन दिवसांत वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह जपान, नॉर्वे, स्वीडन, चीन आदी देशांतील पर्यटकांनी हजेरी लावली. त्यांचे वन विभाग व कार्यकारी समितीमार्फत स्वागत करण्यात आले. त्यावेळी वनपाल श्रीरंग शिंदे, वनरक्षक अर्जुन चव्हाण, समीर फुलवरे यांच्यासह समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर आखाडे, मारुती चिकणे, विठ्ठल कदम उपस्थित होते. 

वाहनतळ फुल्ल, ज्येष्ठांना त्रास! 
घाटाई फाटा येथून पठारावर जाण्यासाठी समितीमार्फत आठ बस सतत फेऱ्या मारत असतानाही बससाठी जागा मिळवण्यासाठी दिवसभर पर्यटकांची रांग हालत नव्हती. काही ज्येष्ठ नागरिकांना या रांगेत ताटकळत उभे राहून त्रास होत होता. काही जण खाली पार्किंग असतानाही पठारावर वाहने नेत होते. समितीमार्फत पठारावर वाहने थांबू नयेत म्हणून स्वयंसेवक परिश्रम घेत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com