कडकनाथ फसवणुकीचा तपास आता 'या' शाखेकडे 

Kadaknath Hen Fraud Case Investigation Follow Up
Kadaknath Hen Fraud Case Investigation Follow Up

सांगली - फलटण येथील फूड बर्ड ऍग्रो प्रायव्हेट कंपनीने कडकनाथ कोंबडी पालनप्रकरणी शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी 54 लाख 66 हजारांची फसवणूक झाली. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 140 गुंतवणूकदार शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

अधिक माहिती अशी, की फूड बर्ड कंपनीकडून फसवणूक झाल्याची फिर्याद इसाक अजमुद्दीन पठाण यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार कंपनीचे चेअरमन मोहनराव भालचंद्र निंबाळकर, संचालक योगेश मोहनराव निंबाळकर, गणेश अरविंद निंबाळकर, सुनील अण्णा धायगुडे, राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे, सचिन तुकाराम करे, संजय भगवान भोरे, जॉन्सन क्रिस्तोफर रायचुरी, व्यवस्थापकीय संचालक शौकत मिरासो करीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

फिर्यादीतील तपशील असा

फिर्यादीत म्हटले आहे, की कंपनीच्या एका युनिटमध्ये 75 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास कंपनी 220 कडकनाथ कोंबड्या व दहा महिन्यांचे कोंबडी खाद्य, औषध व भांडी देणार असल्याचे सांगितले होते. सभासदांकडून एका वर्षात कडकनाथ कोबडीची एकूण 8500 अंडी 2 लाख 38 हजार रुपयांना कंपनी खरेदी करणार असल्याचेही सांगितले होते. तसेच एका वर्षात दोन लाख 38 हजारांचा फायदाही गुंतवणूकदारास होईल, असे आमिष दाखवण्यात आले.

१४० शेतकऱ्यांनी गुंतवले होते पैसे

सांगलीतील गुंतवणूकदारास फलटण येथे जाण्यास त्रास होतो म्हणून सांगलीतील शंभरफुटी रस्ता परिसरात कंपनीचे कार्यालय उघडले होते. त्यानंतर जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले होते. त्याची रक्‍कम 1 कोटी 54 लाख 66 हजार रुपये इतकी होती. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. आता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com