कडेगाव नगरपालिका वार्तापत्र : नवे कारभारी शहर विकासाचे शिवधनुष्य पेलणार

Kadegaon Municipal Newsletter : The new steward will take the lead in the development of the city
Kadegaon Municipal Newsletter : The new steward will take the lead in the development of the city

कडेगाव (जि. सांगली) : नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी संगीता राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी दिनकर जाधव यांची नुकतीच निवड झाली. नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर नव्याने झालेल्या या निवडी राजकीयदृष्ट्या व शहर विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. नूतन पदाधिकाऱ्याकडून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीं व तमाम नागरिकांना शहराच्या चौफेर विकासाच्या अपेक्षा आहेत. तेव्हा ते शहर विकासाचे शिवधनुष्य नक्कीच पेलतील अशी आशा येथील नागरिकांना आहे. 


कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या सेकंड टर्मसाठी सर्व साधारण महिला असे आरक्षण निघाले होते. त्यामुळे या प्रवर्गातील नगरसेविका नीता देसाई यांना नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला तर उपनगराध्यक्षपदी राजू जाधव यांना संधी मिळाली. त्यानंतर जवळपास दोनवर्षांच्या कालखंडानंतर नीता देसाई व राजू जाधव यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर आता संगीता राऊत यांना नगराध्यक्षपदी तर दिनकर जाधव यांना उपनगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. तर आता सहा ते सात महिन्यानंतर नगरपंचायतीची निवडणूक येऊ घातलेली आहे.त्यामुळे नूतन नगराध्यक्षा सौ.राऊत व उपनगराध्यक्ष श्री. जाधव यांच्या समोर शहरांतील विकासकामांचा बॅकलॉग भरुन काढण्याचे मोठे आव्हान आहे. 


हे आव्हान जरी असले तरी राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव शहराचा चेहरा मोहरा बदलुन टाकण्यात कसलीही अडचण नाही.राज्यमंत्री डॉ. कदम हे नगरपंचायतीला विकासासाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाहीत. 


तेव्हा नूतन पदाधिकाऱ्यांनी शहरांत पाणी योजना राबविणे, हद्दवाढ, सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, भाजी मंडई, कोतमाई ओढ्याचे नावीन्यपूर्ण योजनेतून सुशोभीकरण, टाऊन हॉल, शहरांत सम-विषम पार्किंग, प्रभागवार बागबगीचा, रस्त्याकडेने वृक्ष लागवड आदी विविध विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तरच शहराचा सर्वांगीण विकास होऊन कडेगाव हे स्मार्ट सिटी होईल यामध्ये कसलीही शंका नाही. तर आता शहराच्या सर्वांगीण आणि चौफेर विकासासाठी नूतन नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचेसह सर्व नगरसेवक, नगरसेविका पुन्हा नव्या जोमाने प्रयत्नशील राहतील असा विश्वास येथील तमाम नागरिकांना वाटत आहे.

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com