कडेगाव तालुक्‍यात येथे भाजपला खिंडार...30 जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

रवींद्र मोहिते 
Sunday, 16 August 2020

वांगी(सांगली)-  वांगी (ता. कडेगाव) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काल प्रवेश केला. यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरूण लाड, जि. प. गटनेते शरद लाड प्रमुख उपस्थित होते. 

वांगी(सांगली)-  वांगी (ता. कडेगाव) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काल प्रवेश केला. यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरूण लाड, जि. प. गटनेते शरद लाड प्रमुख उपस्थित होते. 

वांगी येथील भाजपचे कार्यकर्ते गेल्या दोन वर्षांपासून पक्षाच्या कामकाजावर अत्यंत नाराज होते. तसेच स्थानिक काही मोजक्‍या कार्यकर्त्यांनी नेत्याजवळ केलेल्या कोंडाळ्यामुळे नाराज झालेल्या 30 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भुमिका आम्ही निश्‍चित घेवु तसेच कडेगाव तालुक्‍यातील विकास कामांचे प्रश्न कधीही सूचवा ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

रमेश एडके म्हणाले, की बहुजन कष्टकरी समाजाला अरुण लाड व शरद लाड हे न्याय देऊ शकतात. ही आम्हा सर्वांची धारणा व अनुभव आहे. बहुजन समाज व वांगीचा विकास क्रांति उद्योग समुह निश्‍चित पणाने करेल अशी अपेक्षा त्यानी यावेळी व्यक्त केली. 
यावेळी माजी ग्रा. सदस्य रमेश एडके, संपतराव देशमुख दुध संघाचे माजी संचालक बाळासाहेब वत्रे, सतीश तुपे, विठ्ठलदेव सोसायटीचे उपाध्यक्ष शामराव हुबाले, जगन्नाथ चव्हाण, अशोक देशमुख, धोंडीराम कोळी, संजय कुंभार, संजय एडके, संजय कांबळे आबासो शिंदे, संतोष दाईंगडे, बुवाजी देशमुख, श्रीहरी सुर्यवंशी, इंद्रजीत मोहीते, वासू बोडरे उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in Kadegaon taluka 30 bjp activists joined NCP