कागलचे राजे समरजितसिंह घाटगे यांचा पुण्यात सहकुटुंब रिक्षातून प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

कागल - राजकारण आणि समाजकारणात सतत व्यस्त असलेल्या राजकीय व्यक्तींच्या जीवनात कुटुंबासमवेत आनंद घेण्याचे निवांत क्षण तसे दुर्मिळच असतात. शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी काल (शनिवार) पुण्यात सहकुटुंब रिक्षामधून प्रवास केला.

पुण्याचे प्रसिद्ध दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन पत्नी नवोदिता व चिरंजीव आर्यवीर यांच्यासमवेत दर्शन घेतले आणि या आनंदी क्षणांची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

समरजितसिंह यांचे सी.ए.चे शिक्षण पुण्यात झाले आहे. या काळात त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे पीएमटी बस व रिक्षामधून प्रवास केला होता. त्या आठवणीतील मुक्त क्षणांच्या पुन्हा प्रत्ययासाठी सामान्य माणसांच्या आवडत्या असा रिक्षामधून त्यांनी प्रवास केला. त्यांच्यासोबत पत्नी नवोदिता व चिरंजीव आर्यवीर होते. त्यांनी पुण्याचे प्रसिद्ध दैवत श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पुणे शहरातून फिरताना त्यांना कागलचेही स्मरण येत राहिले. त्यातून त्यांनी हे आनंदी क्षणाबद्दल सोशल मीडियावर 
पोस्ट केले. 

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये समरजितसिंह म्हणतात, आज पुण्यात खूप वर्षांनी रिक्षातून प्रवास केला. पत्नी नवोदिता आणि मुलासोबत कॉलेजच्या काळातील दिवस पुन्हा जगण्यात वेगळाच आनंद मिळाला. पुण्याचे आराध्यदैवत दगडूशेट हलवाई गणपती मंदिरात जाऊन तिघांनी दर्शन घेतले. सहज सोपा असा एक दिवस कुटुंबासमवेत घालवून प्रसन्न वाटले आणि पहिली आठवण झाली, ती माझ्या कागलची.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kagal King Samarjeetsingh Ghatge travel in Auto in Pune