शिरढोणला कलावंतीणी कोड्याचे कुतूहल

शम्मू मुल्ला
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर

  • कलावंतीणीचे कोडे हे कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण गावापासून चार किमी तर बोरगावपासून अडीच किमी अंतरावरचे ठिकाण, 
  • ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या ठिकाणाला आजही महत्त्व 
  • कोड्याची माळ अशी या ठिकाणाची ओळख
  • आजही या रस्त्यावरून जाणारे प्रवासी कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात; पण सुटत नाही.
  • हे कोडे प्रवांशाचे खास आकर्षण 

शिरढोण - कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण गावापासून चार किमी तर बोरगावपासून अडीच किमी अंतरावर कलावंतीणीचे कोडे हे ठिकाण आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या याला आजही महत्त्व प्राप्त आहे. हे कोडे अध्याप सुटत नाही याबाबत लोकांत कुतूहल आहे. 

कलावंतीणचे कोडे हे आज अखेर न सुटलेले कोडे आहे हे सोडवण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला; परंतु कोडे सुटले नाही या कोडे बाबतची आख्यायिका अशी अंदाजे चारशे वर्षांपूर्वी या भागात कलावंतीणी रहात होती. ही कलावंतीणी अतिशय श्रीमंत होती. तिच्याकडे नोकर-चाकर तसेच पाचशे बिगा जमीन होती. ती कलावंती घोडेस्वारीमध्ये निष्णात होती. या  कलावंतीणीची सौंदर्य कला तत्कालीन दिल्ली बादशहाच्या कानी गेली. या कलावंतीणीला आपल्याकडे येण्यासाठी सैनिकांमार्फत निमंत्रण दिले.

चौदा दिवसांच्या प्रवासानंतर बादशहाचे सैन्य कलावंतीणीच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी बादशहाचा निरोप कलावंतीणीला दिला. यावर कलावंतीणीने त्यांना उत्तर दिले. जर तुम्ही मात्र सांगितलेल्या दोन अटी पूर्ण  केल्यास मी बादशहाकडे यायला तयार आहे. पहिली अट तुम्ही माझ्याबरोबर एक प्रहर घोडे सवारी करून  त्यामध्ये मला पराजित करायचं व दुसरी अट म्हणजे याठिकाणी दगडाचे कोडे तयार केले आहे ते सोडवून त्यातून तुम्ही बाहेर पडायचे या दोन्ही अटी सैनिकांनी मान्य केल्या; मात्र या दोन्ही अटींमध्ये ते अपयशी ठरले व रिकाम्या हाताने सैन्य निघून गेले. त्यानंतर स्वतः बादशहा दिल्लीहून येथे आला. त्यांनी ही कलावंतीणीच्या असणाऱ्या अटी सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही सोडवता आल्या नाहीत.

प्रवाशांचे आकर्षण
तासगाव ते कवठेमहांकाळ रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्याकडेला असलेले कोडे ठेकेदाराने कलावंतीणीच्या कोड्याला बाजूने बांधकाम करून त्यामध्ये पेव्हिंग  ब्लॉक बसविले आहेत व या कोड्याचे सुशोभीकरण केले. तर बाजूस बसण्यासाठी बाकड्याची सोय केली आहे. कोड्याची माळ अशी या ठिकाणाची ओळख झाली आहे. आज ही या रस्त्यावरून वाहनधारक, दुचाकीस्वार व पायी जाणारे प्रवासी कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात; पण सुटत  नाही. हे कोडे प्रवांशाचे आकर्षण ठरले आहे.

 

Web Title: Kalaavantinis puzzle in Shirdhon Tourist attraction