कळंबा कारागृह हाऊसफुल्ल

Kalamba-Jail
Kalamba-Jail

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी झाल्याने कारागृह हाऊसफुल्ल झाले आहे. १७०० कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहात सध्या महिला व पुरुष असे मिळून जवळपास दोन हजारांहून अधिक कैदी आहेत. वाढत्या कैद्यांच्या पार्श्वभूमीवर सहा नवीन बरॅकचा प्रस्ताव प्रशासनाने सार्वजिनक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. लवकरच त्याला मजुरी मिळणार असून त्यामुळे कारागृहाच्या क्षमतेत ३०० ने वाढ होणार आहे.

कळंबा कारागृह पश्‍चिम महाराष्ट्रात महत्त्वाचे आहे. जिल्ह्याबरोबरच पुणे, मुंबई तसेच राज्यभरातील नामचीन गुंड तसेच खून, मारामारी सशस्त्र दरोडा अशा महत्त्वाच्या गुह्यातील कैदी येथे शिक्षा भोगत आहेत. २४ एकरांतील कारागृहात ४० बरॅक आहेत. ज्यामध्ये १७८९ कैद्यांची क्षमता आहे. 

त्याच प्रमाणात अधिकारी व कर्मचारी आहेत; मात्र निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त कैदी झाल्याने कारागृहात गर्दी वाढली आहे. सध्या जवळपास अडीचशे कैदी अतिरिक्त आहेत. काही महिन्यापूर्वी हीच संख्या एकवीसशेच्यावर गेली होती. त्यामुळे साहजिकच सुरक्षेसह इतर यंत्रांना सांभाळताना कारागृह प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.अतिरिक्त संख्या झाल्याने कैद्यांमध्ये वाद होण्याची शक्‍यता असते. त्याच बरोबर अंतर्गत सुरक्षेला ही धोका पोहचू शकतो.सुरक्षेचा भाग म्हणून कारागृहात सीसीटीव्ही बसवण्यात आले  असले तरी कारागृहात वाढणारी कैद्यांची संख्या लक्षात घेता कारागृह प्रशासनाने बी प्लस वन प्रकारचे सहा नवीन बरॅक तयार करण्या बाबत चा प्रस्ताव सार्वजिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग याचा लवकरच आराखडा तयार करणार आहे. या नवीन सहा बरॅक मुळे कैद्यांच्या क्षमतेत तीनशे ने वाढ होणार आहे.नवीन बरॅक बरोबरच फाशी यार्ड चा प्रस्ताव ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे.

कारागृहाची निर्धारित क्षमता सतराशे असली तरी आणखी काही कैदी समाविष्ट असतील याची सोय आहे. मात्र, तरीही कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता सहा बरॅकचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. सुरक्षेसाठी आवश्‍यक मनुष्यबळही कारागृहाकडे आहे.
- शरद शेळके, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com