‘कळंबा’ची पाणी पातळी १६ फुटांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

गतवर्षीपेक्षा ३ फुटांनी कमी; गावाला दिवसाआड पाणी पुरवठा

कळंबा - उन्हाळ्याची सुरवात होत असतानाच कळंबा तलावातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होत चालला आहे. तलावाची पाणी पातळी फेब्रुवारीतच १६ फुटांपर्यंत गेली आहे. गतवर्षी फेब्रुवारीत ती १९ फुटांवर होती. त्यामुळे यंदा कळंबा गावालाही ग्रामपंचायतीने दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली आहे. आत्ताच ही वेळ आल्याने काही दिवसांनी कोल्हापूर शहरालाही याची झळ बसणार आहे. 

उन्हाळ्याची सुरवात होताच कळंबा तलावाच्या पूर्व, पश्‍चिम, दक्षिण बाजूच्या क्षेत्रातील पाणी साठ्यामध्ये प्रचंड प्रमाणात घट होत आहे. गेल्या वर्षी तलाव पूर्णपणे आटला होता. त्यावेळी तलावातील गाळही काढला होता. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तलाव ओसंडून वाहिला. सध्या असलेले पाणी कळंबा गावासह शहरातील कळंबा फिल्टर हाऊस येथे उपसा करून शहरातील काही भागात पुरवले जाते. सध्या कळंबा गावात एक हजार नळ कनेक्‍शन आहेत. कळंबा गावाला रोज १८ लाख लिटर पाण्याची 
गरज असते. 

दरम्यान, पाणीसाठा कमी होत असल्याचा विचार करून महापालिकेने कळंबा ग्रामपंचायतीला एक दिवस आड तलावातून पाणी उपसा करावा, अशी विनंती केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीनेही दिवसाआड पाणी पुरवण्यास सुरवात केली आहे. 

कळंबा तलावातील पाणीसाठा कमी होत असल्याने महापालिकेने एक दिवसआड पाणीपुरवठा करावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यवाही करत आहे. 
- दीपक तिवले, ग्रामपंचायत सदस्य, कळंबा

Web Title: kalamba lake water lavel decrease