esakal | म्हणून कळंबी कालवा फुटला

बोलून बातमी शोधा

KOP20J44990

कवलापूर ः सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे सध्या श्री दत्त इंडिया कंपनीकडून रसुलवाडी हद्दीतील म्हैसाळ कालव्यात गेली महिनाभराहून अधिक काळ पाणी सोडले जात आहे. कालव्यात पाणी केली आठवडा ओव्हरफ्लो झाले होते. शुक्रवारी सायंकाळी हा कालवा रसुलवाडीच्या ओढ्यावर फुटला आहे.

म्हणून कळंबी कालवा फुटला
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कवलापूर ः सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याचे सध्या श्री दत्त इंडिया कंपनीकडून रसुलवाडी हद्दीतील म्हैसाळ कालव्यात गेली महिनाभराहून अधिक काळ पाणी सोडले जात आहे. कालव्यात पाणी केली आठवडा ओव्हरफ्लो झाले होते. शुक्रवारी सायंकाळी हा कालवा रसुलवाडीच्या ओढ्यावर फुटला आहे.

यामुळे पुन्हा हजारो लिटर पाणी ओढ्यांनी कृष्णा नदीकडे वाहत आहे. फुटलेला कालव्यात अद्यापही कारखान्यांकडून पाणी सोडण्याचे सुरुच ठेवले आहे. पाणी बंद करण्याऐवजी कालवा तुंबण्यासाठी कारखान्यांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. ओढ्यात पाणी जादा असल्यामुळे जेसीबी मातीत रुतुन बसल्याने दुपारी जुजबी कामही थांबवावे लागले. 

हे पण वाचा - महाराष्ट्राच्या या प्रमुख नदीची प्रदुषणमुक्ती प्रस्तावात अडकली

लवा फुटल्यानंतर सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. मात्र परिसरातील दहा ते पंधरा एकरावरील पिकांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झालेले आहे. ज्या ठिकाणी कालवा फुटला आहे. त्या ठिकाणी चार वस्त्या आहेत. कालवा दुसऱ्या ठिकाणी फुटला असता तर मात्र सांडपाणी वस्तीत घुसण्याची शक्‍यता होती.

शुक्रवारी सायंकाळी कालवा फुटल्यानंतरही साखर कारखान्यांकडून पाणी सोडणे सुरुच ठेवलेले आहे. दररोज हजारो लिटर पाणी कालव्यात सोडले जात आहे. पाणी योजनेच्या जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे सध्या पाणी कोठे सोडायचे असा प्रश्‍न कारखाना प्रशासनासमोर कायम आहे. 

कवलापूर, रसुलवाडी ग्रामस्थांनी गावबंद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर कारखान्यांने ओढ्यात पाणी सोडणे बंद केले होते. मात्र कालवा फुटल्याने गेली महिनाभर साचलेला पाणी पुन्हा ओढ्यातून कृष्णानदीकडे जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आंदोलकांना कारखान्यावर तातडीने नोटीस व कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. अद्याप प्रदूषण मंडळाकडून कार्यवाही झालेली नाही. 

हे पण वाचा - सांगली पोलिसांच्या ताफ्यात आता या अत्याधुनिक बाईक...

कारखान्यांकडून हात वर... 
सांडपाण्याबाबत कारखाना प्रशासनाने हात वर केले आहेत. जणू काही यामध्ये कारखान्याची चूक नाही, असेच त्यांनी स्पष्ट केले. कारखान्यांची चूक किंवा सांडपाणी नसेल तर त्यांच्याकडून जुजबी दुरुस्तीचे प्रयत्न का केले जात आहेत, असा प्रश्‍न आहे. 


 

 कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे कालव्यातील पाणी फुटलेले नसून शेतकऱ्यांच्या चुकीमुळे पाणी ओढ्यात जात आहे. तरीही आम्ही पाणी तुंबण्याचा प्रयत्न करीत आहे.
शरद मोरे, व्यवस्थापक, श्री दत्त इंडिया कंपनी.