Kalburgi murder case: संशयित आरोपी न्यायालयासमोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalburgi murder case
Kalburgi murder case: संशयित आरोपी न्यायालयासमोर

Kalburgi murder case : संशयित आरोपी न्यायालयासमोर

बंगळूर : ज्येष्ठ संशोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना आज धारवाड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा दावा न्यायालयातून बाहेर आल्यानंतर केला.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

खून प्रकरणातील ६ पैकी चार आरोपींना पोलिसांनी धारवाडच्या चौथ्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. हुबळी येथील अमित बद्दी, धारवाडचे गणेश मिस्कीन, महाराष्ट्राती वासुदेव सूर्यवंशी आणि बेळगावच्या प्रवीण चतूर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. कलबुर्गी यांच्या हत्येतील आरोपींवर २१ आणि २२ डिसेंबरला पुढील सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या २१ आणि २२ तारखेला इतर आरोपींना हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या डॉ. कलबुर्गी यांची हत्या केली होती.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

कन्नड का बोलत नाही?

महाराष्ट्रातील विचारवंत गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी याच आरोपींवर यापूर्वीही खटला चालला आहे. खटल्यादरम्यान, आरोपीने मराठीत उत्तर दिले असता तुम्ही बेळगावात रहाता मग कन्नड का बोलत नाही, असा प्रश्न न्यायाधीशांनी आरोपीला विचारला. त्यांना भेटायला आलेल्या कुटुंबीयांशी आणि वकीलांशी बोलण्याची संधीही त्यांनी घेतली. न्यायमूर्तींनी ही भेट मान्य करत न्यायालयाच्या आवारात येण्यास परवानगी दिली. महाराष्ट्रातील गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात परत करण्याची परवानगी देणारी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी लवकर व्हावी, या उच्च न्यायालयाच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष सरकारी वकिलांचीही नियुक्ती केली आहे. २० आणि २१ डिसेंबरला सुनावणी होणार असल्याचे सांगत न्यायालयाने सुनावणी

loading image
go to top