कळमोडी धरण शंभर टक्के भरले, सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात

राजेंद्र लोथे
गुरुवार, 12 जुलै 2018

चास (खेड) - तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण बुधवार ता 11 रोजी सायंकाळी शंभर टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे

चास (खेड) - तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण बुधवार ता 11 रोजी सायंकाळी शंभर टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे

दीड टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात 2.67 दश लक्ष घन मीटर पाणीसाठा झाला आहे. धारणास दरवाजे नसल्याने  धरण भरताचं सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. मागील वर्षी 4 जुलै रोजी धरण भरले होते. मात्र चालू वर्षी 11 जुलै हा दिवस उजाडला कळमोडी धरण भरल्याने त्या मधून होणारा पाण्याचा विसर्ग चास कमान धरणात येत असल्याने चास कमान धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता अशोक मुरुडे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

Web Title: The kalmodi dam was filled with hundred percent