नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदी कल्पना पंडित यांची निवड

सुनील गर्जे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

नेवासे : नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदी खरवंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या कल्पना नाथाभाऊ पंडीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतिपदी मंडलिक यांना कायम ठेवण्यात आले. निवडीनंतर त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने नेवासे पंचायत समितीत पुन्हा एकदा महिलाराज आले आहे. 

नेवासे : नेवासे पंचायत समितीच्या सभापतीपदी खरवंडी गणाच्या पंचायत समिती सदस्या कल्पना नाथाभाऊ पंडीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतिपदी मंडलिक यांना कायम ठेवण्यात आले. निवडीनंतर त्यांचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने नेवासे पंचायत समितीत पुन्हा एकदा महिलाराज आले आहे. 

विद्यमान सभापती सुनीता गडाख यांनी सकल मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणासाठी 31 जुलै रोजी आपल्या सभापतीपदाबरोबरच व सोनई गणातील पंचायत समिती सदस्यात्वाचा त्याग करत जिल्हा परिषदेकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे रिकाम्या असलेल्या सभापती पदाच्या निवडीची मंगळवार (ता. २८) रोजी पंचायत समीतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीत सदस्याची बैठक घेण्यात आली. सकाळी निवडणूक अधिकाऱ्याकडे सभापतीपदासाठी पंडित यांचा एकमेव अर्ज आला होता. दरम्यान दुपारी दोन वाजता गाडेकर यांनी सभापती म्हणून कल्पना पंडित यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी क्रांतिकारी पक्षाचे बारा व राष्ट्रवादी, भाजप प्रत्येकी एक असे सर्व चौदा सदस्य उपस्थित होते. सभापती निवडी नंतर झालेल्या बैठकीत उपसभापतीपदी राजनंदिनी मंडलिक यांनाच कायम ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

दरम्यान, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत अध्यक्षतेखाली पंचायत समिती आवारात झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते कल्पना पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती सुनीता गडाख, दिगंबर शिंदे, भाजपचे नेते दिनकर गर्जे, जिल्हा परिषद माजी सदस्या शकुंतला गडाख, जिल्हा परिषद प्रचार्ये डॉ. लक्ष्मण मतकर, रामराव भदगले, मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, बाजार समितीचे अध्यक्ष कडूबाळ कर्डीले, भैय्यासाहेब देशमुख, प्रदीप ढोकणे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पुरुषातम् सर्जे, महमद आतर, जानकिराम डौले, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे उपस्थित होते. 

विश्वास सार्थ ठरवील : कल्पना पंडित

आमच्या नेत्या सुनीता गडाख यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पंचायत समितीचे काम करणार आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व माजी आमदार शंकरराव गडाख यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास सार्थ ठरवील. अशी प्रतिकिया नवनिर्वाचित सभापती कल्पना पंडित यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. 

Web Title: Kalpana Pandit elected as Chairman of Nevase Panchayat Samiti