निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सोलापूर - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट ‘म्होरक्‍या’चे निर्माते कल्याण पडाल (वय ३८) यांनी सोलापुरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. या उपचारासाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज परत न करू शकल्याने त्यांनी पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गुरुवारी आत्महत्या केली आहे.

कर्करोगामुळे पडाल यांची प्रकृती खूपच बिघडली होती. कर्ज परत न केल्याने दोन दिवसांपूर्वी सावकाराने त्यांना घरातून बाहेर नेले व डांबून मारहाण केली होती. त्यामुळेच ते अधिकच तणावाखाली होते. कल्याण यांचा बांधकाम जागा खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता.

Web Title: kalyan padal suicide