युवक कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी कोल्हापुरच्या कल्याणी माणगांवे 

युवक कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी कोल्हापुरच्या कल्याणी माणगांवे 

कोल्हापूर - महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदी कोल्हापुरातील अॅड. कल्याणी माणगांवे यांची निवड करण्यात आली. युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राज्यभरातील या निवडी आज जाहीर केल्या. अॅड. माणगांवे ह्या मंगळवार पेठेतील रहिवाशी आहेत. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर युवक कॉंग्रेसचे संघटन मजबूत व्हावे यादृष्टीने राज्यभरातील पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. नव्याने निवडी करताना राज्यातील युवक युवतींना त्यात संधी देण्यात आली आहे. या निवडीत राज्यभरात पाच प्रवक्‍त्यांची निवड करण्यात आली असून त्यात अॅड. माणगांवे यांचा समावेश आहे. सहा महिन्यापुर्वी त्यांची निवड पक्षाच्या सचिवपदी झाली होती. 

व्यवसायाने वकिल असलेल्या कल्याणी यांच्यामागे फारशी राजकीय पार्श्‍वभुमी नाही तरीही त्यांची निवड झाल्याने एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिल्याचे समाधान कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

या निवडीसाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

अन्य प्रवक्ते नियुक्ती अशी - 

अन्य प्रवक्‍त्यांत ठाणे जिल्ह्यातील ब्रिज किशोर दत्त, नाशिकमधून नयना गावित, भिवंडीतून रिषिका राका, नांदेडमधून बालाजी गाडे व आनंद सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com