‘कमळा’चे ब्रॅंडिंग
सातारा - भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हाचे ब्रॅंडिंग सुरू केले आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरात पाच ठिकाणी लोकांचे लक्ष जाईल, अशा ठिकाणी कमळाचे चिन्ह लावायचे आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्याचे सांगितले जात आहे. त्याची अंमलबजावणी सध्यातरी कऱ्हाड उत्तर व दक्षिण मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. येथे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलविण्याची तयारी केली आहे.

त्यासाठी सर्व पातळीवर तयारी सुरू आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून राज्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी साताऱ्यात लक्ष घातले आहे. याला मलकापूर पालिकेची निवडणूकही कारणीभूत आहे. येथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला हादरा देऊन मलकापूरवर सत्ता काबीज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. यापुढे जाऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीही आतापासून ‘मायक्रो प्लॅनिंग’ भाजपचे नेते राबवत आहेत. नुकतीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कऱ्हाडला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या. यामध्ये त्यांनी पक्षाचे कमळ चिन्ह प्रत्येकाच्या मनात उतरविण्यासाठी एक अनोखा उपक्रम जाहीर केला आहे.
प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपण राहात असलेल्या घरावर, तसेच पक्षातील कार्यकर्त्यांच्या घरावर पाच ठिकाणी कमळाचे चिन्ह सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लावण्याची सूचना केली आहे. त्यानुसार याची अंमलबजावणी सुरू झाली असून, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर मतदारसंघात आता काही घरांच्या भिंतीवर कमळाची चिन्हे दिसू लागली आहेत. यातून भाजपला आगामी निवडणुकीत आपले चिन्ह प्रत्येकाच्या मनात रुजवायचे असल्याचे स्पष्ट होत आहे. यातूनच आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर कमळाची चिन्हे आगामी काळात दिसणार आहेत.
जिल्हा निवडणूक विभागाकडे तोंडी तक्रार
राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडे तोंडी तक्रारही केली; पण हा त्यांच्या पक्षाचा भाग असल्याचे सांगण्यात आले, तर निवडणूक आचारसंहितेनंतर ही चिन्हे पुसली जातील, असेही सांगण्यात आले. त्यामुळे सध्यातरी यावर पडदा पडला असला, तरी निवडणुकीपर्यंत कमळाची चिन्हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक घरावर दिसणार आहेत.