भंडाऱ्याच्या उधळणीत रंगला पाच गावातील कामसिद्ध बंधू-भेटीचा सोहळा 

प्रशांत माळी
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

आंधळगाव (सोलापूर) : 'कामसिध्दाच्या नावने चांगभले....' या जयघोषाने सारा आसमंत निनादून निघाला होता. यावेळी धनगरी ढोल, मुक्तहस्ताने होणारी भंडाऱ्याची उधळणीत अशा भक्तीमय वातावरणात खुपसंगी (ता.मंगळवेढा) येथे मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील पाच गावातील श्री.कामसिध्द बंधू-भेटीचा नयनरम्य  उत्साहात पार पडला. 

भेट सोहळ्यासाठी सांगोला तालुक्यातील सावे व शिरभावी आणी मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी, खोमनाळ, हिवरगाव तसेच या पाच गावच्या पालख्या खुपसंगीच्या गावच्या बंधूभेटीला दाखल झाल्या असून या बंध-भेटीच्या सोहळ्याकरिता खुपसंगी, सावे, शिरभावी, खोमनाळ, हिवरगाव, तळसंगी, पाठखळ, गोणेवाडी, जुनोनी, आंधळगाव , गणेशवाडी, लेंडवेचिंचाळे, मंगळवेढा व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने व भक्तीभावाने उपस्थित होते.

कामसिध्द बंधू-भेटीच्या सोहळ्याची जय्यत तयारी श्री क्षेत्र खुपसंगी येथील यात्रा कमिटीकडून करण्यात आली होती . सोहळ्यानंत रात्री आर्केस्ट्रा गंधार म्युझिकल नाईट कोल्हापूर चा कार्यक्रम झाला आज दिवसभर गजी ढोल व  नैवद्य व आर्केस्ट्रा धडाका कोल्हापुर यांचा कार्यक्रम होणार असुन. उद्या भेटावयास अलेल्या लहान भावंडाना सांयंकाळी 4 वाजता मोठ्या भक्ती भावाने व जल्लोषात निरोप दिला जाणार आहे.या भेट सोहळ्यास मोठी परपंरा आहे.

Web Title: kamsiddha bandhu bhet in mangalwedha