रयत शिक्षण संस्थेला कुलगुरू कणबरकर पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणारा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार सातारा येथील रयत शिक्षण संस्थेला जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शालिनी कणबरकर व शिवाजी विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार पुरस्काराचे वितरण 13 एप्रिलला विद्यापीठाच्या शाहू सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. एक लाख 51 हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

कुलगुरू कणबरकर यांच्या स्मृती जागविण्यासाठी कणबरकर कुटुंबीय व विद्यापीठात झालेल्या सामंजस्य करारानुसार गेल्या वर्षीपासून पुरस्कार देण्यात येतो. भाषा, साहित्य, कला, शास्त्र, क्रीडा, समाजसेवा आदी क्षेत्रांतील कर्तृत्वावान व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या वर्षी या पुरस्काराने संशोधक डॉ. सी. एन. आर. राव यांना गौरवण्यात आले आहे. 

या वेळी प्रभारी प्र. कुलगुरू डी. टी. शिर्के, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बी. ए. खोत, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर आदी उपस्थित होते. 
 
दृष्टिक्षेपात "रयत'चा विस्तार 
- 15 जिल्ह्यांत 42 महाविद्यालये 
- 438 माध्यमिक विद्यालये 
- 8 अध्यापक महाविद्यालये 
- 42 प्राथमिक, 31 पूर्व प्राथमिक शाळा 
- 80 वसतिगृह, 2 आयटीआयसह अन्य 65 विभाग 
- साडेचार लाखांवर विद्यार्थी 
- 15 हजार सेवक वर्ग 

Web Title: kanbarkar award