प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना कणबरकर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार यंदा जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर झाला आहे.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार यंदा जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना जाहीर झाला आहे.

माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांच्या हस्ते 12 जानेवारीला या पुरस्काराचे वितरण होईल. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमास सुरवात होणार आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

एक लाख 51 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापुर्वी तो ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. एन. आर राव, रयत शिक्षण संस्था, जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला आहे. 

Web Title: Kanbarkar Award to Prof N D Patil