कान्हूर पठार ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू

सनी सोनावळे
बुधवार, 16 मे 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर): पारनेर तालुक्यातील संवेदनशील व पठार भागाला राजकीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दिशा देनाऱ्या कान्हूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज (बुधवार) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यासाठींच्या तेरा जागांवर सत्तावीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहे.

सरपंच पदासाठी सरळ लढत होत आहे. स्व.माजी आमदार बाबासाहेब ठुबे ग्रामविकास पॅनल व ग्रामवैभव पँनल मध्येच सरळ. लढत होत आहे सरपंच पदासाठी ग्रामविकास पँनलचे गोकुळ उर्फ अलंकार काकडे व ग्रामवैभव पँनलचे दगडु उर्फ डी.सी.व्यवहारे यांच्यात सरळ लढत होनार आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये अंकुश ठुबे हे अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत.

ग्रामवैभव उमेदवार पुढील प्रमाणे: नवनीत सोनावळे, मिराबाई ठुबे, अर्जुन नवले, छाया ठुबे, श्रीकांत ठुबे, प्रसाद शेळके, सुलोचना वाघुंडे, अलका घोडके, सुनिता लोंढे, बबन व्यवहारे, वैभव महेंद्र साळवे, संगीता ठुबे, संगिता व्यवहारे

स्व.बाबासाहेब ठुबे ग्रामविकास पँनलचे उमेदवार पुढील प्रमाणे : ज्ञानेश्वर ठुबे, सुरेखा नवले, अंकुश नवले, पुष्पा ठुबे, बापू चत्तर, दर्शन काकडे, सुनिता गायकवाड, सागर व्यवहारे, मनीषा घोडके, भाग्यश्री लोंढे, शारदा साळवे, शोभा ठुबे, अलका व्यवहारे हे उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत.

Web Title: kanhur pathar gram panchayat election start