रस्त्यावर मंडप टाकून कान्हुर पठार ग्रामस्थांचे रास्ता रोको

सनी सोनावळे 
मंगळवार, 3 एप्रिल 2018

टाकळी ढोकेश्वर - कान्हुर पठार(ता.पारनेर) सह परीसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मांड-ओहळ ही योजना महावितरणाच्या चुकीच्या धोरणामुळे बंद आहे. ही योजना त्वरित सुरु करण्यासाठी विद्युत पुरवठा सुरू करावा अन्यथा पारनेर तालुक्यातील महावितरणच्या विद्युत उपकेंद्रास टाळे लावु असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनी दिला.

कान्हुर पठार येथे आज सकाळी आठ वाजता गाव बंद ठेवुन मुख्य चौकात पारनेर कान्हुर रस्त्यावर मांडओहळ सोळा गाव योजनेचा विज विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली आज पुन्हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. काल नगर येथे झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे ठुबे यांनी सांगितले. यावर प्रशासनाने त्वरीत निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: kanhur pathar villagers rasta roko for water problem