अन्‌ कंसमामाचे पितळ उघडे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- भाच्याचा दाबला दोरीने गळा 
- दैव बलवत्तर होते म्हणून वाचला "तो' 
- दुसऱ्या दिवशी उठून त्याने केला वडिलांना फोन 

सोलापूर : पतंगाला मांजा घेऊन देतो, म्हणून घरात कोणालाही न सांगता मामाने भाच्याला घराबाहेर नेले. मामासोबत मुलगा गेल्याने आई-वडीलही झोपले. सोलापुरातील रेवणसिद्धेश्‍वर मंदिरासमोरील नागोबा मंदिरालगतच्या झुडपात नेऊन गळा दाबला. भाचा निपचित पडल्यानंतर तो मृत पावल्याचा अंदाज घेऊन मामा तिथून पसार झाला. मात्र, गुरुवारी (ता. 14) मुलाने वडिलांना फोन केला अन्‌ हकिकत सांगितली. त्यावरून वडील गिरमल मलप्पा काळे (रा. सोनियानगर झोपडपट्टी, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत विठ्ठल शरणप्पा वाघमारे याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

न्यूझीलंडला यायचंय तर १० लाख रुपये आण

विठ्ठल हा सुखापूर हरिग्राम (न्यू पनवेल) येथे राहण्यास आहे. त्याचे मूळगाव दक्षिण सोलापुरातील राजूर आहे. विठ्ठल बुधवारी (ता. 13) बहिणीच्या घरी मुक्‍कामी आला होता. त्या वेळी काम झाले असेल तर कुठेतरी पायपीट करीत फिरू नकोस, नीट राहा, आई-वडिलांकडे जा, असा सल्ला भावजीने विठ्ठलला दिला. त्यानंतर अज्ञात कारणावरून विठ्ठलने भाच्याला मांजा घेऊन देण्याची फूस लावून कोणासही काही न सांगता बाहेर नेले. त्यानंतर त्याने परिसरातील नागोबा मंदिराजवळील झुडपात नेऊन जवळील दोरीने भाच्याचा गळा आवळला. काही वेळात भाच्याची हालचाल बंद झाल्याने तो मृत झाल्याचे समजून विठ्ठलने तिथून काढता पाय घेतला.

जुन्या गाड्यांना नवं करणारा शौकीन बन्शी

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास भाचा उठला अन्‌ त्याने एका व्यक्‍तीच्या मोबाईलवरून वडिलांशी संपर्क साधला. त्या वेळी पोलिस अन्‌ त्याचे आई-वडील त्याला घेऊन आले. त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्या मुलाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

वाघ आला... वाघ आला... video

खुनी हल्ल्यातील आरोपीस चार वर्षांची सक्‍तमुजरी 
वॉंटेड असलेल्या फरार आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथे गेल्यावर गुल्या ऊर्फ प्रतिज्ञान जिजिंग पवार याने पोलिस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या पथकातील पोलिसांवर खुनी हल्ला केला. त्यामध्ये विजयकुमार भरले, लालसिंग राठोड जखमी झाले. या प्रकरणात गुल्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी चार वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारतर्फे ऍड. गंगाधर रामपुरे यांनी तर आरोपीतर्फे अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले. या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kansh mamas intention fail