कऱहाड : कृती समितीचा विमानतळ विस्तारवाढीला विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : येथील विमानतळ विस्तारीकरणात बाधित 28 खातेदारांच्या पुनर्वसन पॅकेजसंबंधी आज दोन बैठका झाल्या. त्यात सुरवातीला काही बाधित तसेच त्यानंतर नव्याने स्थापन कृती समितीसह उर्वरीत बाधितांची प्रांताधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे बैठक घेतली. या बैठकीनंतर कृती समितीने विमानतळ विस्तारवाढीला विरोध असल्याचे प्रशासनाला निवेदन दिले. 

कऱ्हाड : येथील विमानतळ विस्तारीकरणात बाधित 28 खातेदारांच्या पुनर्वसन पॅकेजसंबंधी आज दोन बैठका झाल्या. त्यात सुरवातीला काही बाधित तसेच त्यानंतर नव्याने स्थापन कृती समितीसह उर्वरीत बाधितांची प्रांताधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे बैठक घेतली. या बैठकीनंतर कृती समितीने विमानतळ विस्तारवाढीला विरोध असल्याचे प्रशासनाला निवेदन दिले. 

कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या 28 जणांचे शासन कशा पध्दतीने पुनर्वसन करणार आहे. त्यासाठी काय निकष आहे. याबाबत प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी बैठकीत माहिती दिली. आठ दिवसांत बाधितांनी प्रशासनाला म्हणणे द्यावे, असेही खराडे यांनी सांगितले. तहसीलदार राजेंद्र शेळके, विमानतळ प्राधिकरणाचे कृणाल देसाई, मंडल अधिकारी महेश पाटील, वारूंजीचे सरपंच प्रमोद पाटील आदींसह कऱ्हाड विमानतळ विस्तार वाढविरोधी बाधीतांची कृती समितीचे सदस्य व बाधीत खातेदार उपस्थित होते.

विमानतळ विस्तार वाढीत बाधित होणाऱ्या 28 खातेदार प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांनी तीन ऑगस्टला नोटीस देऊन पुर्नवसनासंबंधीत स्वः मालकची घरे, गोठे, वर्कशॉप आदींच्या कागदपत्रे घेऊन चर्चा करण्यासाठी आज सकाळी दहाला तहसील कार्यालयात बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी बाधीत खातेदारांसह परिसरातील नागरिक तहसील कार्यालयात उपस्थित होते. बैठकीला बाधीत खातेदारांनाच बैठकीसाठी प्रवेश देण्यात येईल, अशी प्रशासनाने भूमिका घेतली. यावेळी बाधितांतर्फे कृती समिती स्थापन केली असून, बाधीतांसह कृती समिती सदस्यांनाही प्रवेश देण्याची विनंती समितीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना करण्यात आली.

मात्र, प्रशासनाने केवळ बाधीत खातेदारांना नोटीस दिल्याचे सांगत बाधिताशिवाय अन्य लोकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे कृती समितीसह काही बाधित बाहेर गेले. प्रशासनाने उर्वरीत बाधिताशी चर्चा करत बैठक घेतली. यावेळी खराडे यांनी शासनाने मंजूर केलेल्या पुनवर्सनाच्या पॅकेजबाबत माहिती दिली.

या बैठकीनंतर विमानतळ विस्तारवाढ विरोधी बाधीतांची कृती समिती व बाहेर गेलेल्या बाधीतांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात कृती समितीने सर्व बाधीतांसह परिसरातील नागरिकांचा विमानतळ विस्तारीकरणाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने ही विस्तारवाढ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. कोणत्याही परिस्थिती विस्तार वाढ होऊ दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात विमानतळ विस्तारवाढीला विरोध कायम होता व असल्याचे नमूद केले आहे. 

Web Title: In Karad Action Committee opposition to the expansion of the airport