कऱ्हाडला रविवारी करिअर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

लोकेशचा सत्कार
नीट २०१८ परीक्षेत ६७० गुण मिळवून लोकेश मंडेले याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दरम्यान त्याने नीट एअरमध्ये ३७, एम्स एअरमध्ये ४१, जीपमेअर एअरमध्ये २१ अशा क्रमांकाने यश मिळवले आहे. या कार्यक्रमादरम्यान लोकेशचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कऱ्हाड - दै. ‘सकाळ’ व ओम इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता.१४) आठवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात खरगपूर आयआयटी येथील करिअर समुपदेशक प्रा. विवेक गर्ग हे जीईई, सीईटी परीक्षेची रुपरेषा व आयआयटीमधील संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

रविवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा कार्यक्रम होईल. नीट परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या लोकेश मंडेले यांचे वडील डॉ. पारस मंडेले हे नीट व एम्स परीक्षेचे स्वरूप व संधी व त्यासाठी करावयाची तयारी याविषयी मार्गदर्शन करतील. ग्रामीण व शहरी भागातील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थी-पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ओम इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट ग्रुपचे संचालक प्रा. परमेश्वर कोठुळे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या नावनोंदणीसाठी ‘सकाळ’ चे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी (मोबा. ९९२२९१३६६४) व ओम इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे संचालक प्रा. कोठुळे (मोबा. ९०९६१३१५५५) यांच्याशी संपर्क साधावा. कार्यक्रमास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार प्रवेश दिला जाईल. विद्यार्थी व पालकांनी नियोजित वेळेपूर्वी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Karad Carrier Guidance SSC Study Education