कऱ्हाडला "स्पॉट फाईन'ला उत्सवात ब्रेक

कऱ्हाडला "स्पॉट फाईन'ला उत्सवात ब्रेक

कऱ्हाड ः सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यासह शौच करणाऱ्यांना जागेवर दंड करण्याचे शासनाने पालिकांना अधिकार दिले आहेत. जिल्ह्यात "स्पॉट फाईन' करण्यात येथील पालिका अग्रेसर राहिली आहे. मात्र, उत्सव काळात त्या "स्पॉट फाईन'ला ब्रेक लागला आहे. वास्तविक उत्सव काळात "स्पॉट फाईन' काटेकोर राबविण्याची गरज आहे. मात्र, पालिकेने त्यातही ढील दिल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. 
जिल्ह्यात सगळ्यात जास्त "स्पॉट फाईन'ची कारवाई येथील पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. सुमारे 50 हजारांचा दंड दोन वर्षांत पालिकेने वसूल करून कारवाईत आघाडी ठेवली आहे. वास्तविक दंडाच्या आकारणीपेक्षा जाग्यावर दंड होतो आहे, याचीच भीती लोकांच्या मनात बसते आहे. आजवर पालिकेने 70 जणांवर कारवाई केली आहे. पालिकेच्या कारवाईत प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या व विकणाऱ्या 50 लोकांवरही दंडात्मक कारवाई झाली आहे. 20 लोकांना उघड्यावर कचरा टाकणे, घाण करणे यांसह उघड्यावर शौचास केल्याबद्दल दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले आहे. एका व्यक्तीस किमान 100, 200, 500 पासून दोन हजारांचाही दंड आकारून त्याची वसुली केली आहे. एकदा चूक केल्याबद्दल 100 ची वसुली करत आहेत. वारंवार चूक केल्यास त्या संबंधितावर शहराच्या सौंदर्यात बाधा आणण्याचे कृत्य केल्याबद्दल फौजदारी दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश पालिकांनाही केवळ हाताच्या बोटावर मोजण्यात इतक्‍याच कारवाया केल्या असताना कऱ्हाड पालिकेने मात्र दंडाचा मोठा आकडा ओलांडला आहे. मात्र, उत्सव व सणासुदीच्या काळात पालिकेच्या "स्पॉट फाईन" मोहिमेस ब्रेक लागला आहे. त्यामुळे स्थिती स्वच्छतेला धोकादायक ठरताना दिसते आहे. नदीकाठ, सार्वजनिक ठिकाणी होणारा कचरा व लोक करत असलेला कचरा साफ होतो आहे. मात्र, त्या संबंधितांना दंड होताना दिसत नाही. 

भावना दुखावल्या जाऊ नयेत... 

गणेशोत्सव, मोहरम व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा करताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. ती कारवाई या काळात अधिक कडकरीत्या राबवली पाहिजे. मात्र, ती होताना दिसत नाही. लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने नरमाईचे धोरण घेतले आहे. नरमाईच्या धोरणामुळे नागरिकांत उत्सव काळात ती भीती राहलेली दिसत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com