कऱ्हाड पालिकेत राजकीय समीकरणे बदलणार?

हेमंत पवार
मंगळवार, 15 मे 2018

कऱ्हाड - सत्ताधारी जनशक्ती आघाडीतील ‘दादा’ आणि पालिकेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्या घरी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोजनासाठी उपस्थिती लावली. स्वागतासाठी जनशक्ती आघाडीचे नगरसेवक उपस्थित राहिल्याने पालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याबाबत चर्चा आहे.

नुकतेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील विकासकामांसाठी दिलेल्या निधीचा आणि कामांचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच महसूलमंत्र्यांनी उपाध्यक्षांच्या घरी भोजनासाठी लावलेली उपस्थिती हा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.  

पालिकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी जनशक्ती आघाडी १६ जागा जिंकून सत्तेवर आली. मात्र, पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष निवडीत मतदारांनी भाजपला कौल दिल्याने भाजपच्या रोहणी शिंदे या नगराध्यक्षा झाल्या. त्यामुळे पालिकेत सत्ता श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्तीची आणि नगराध्यक्ष भाजपचा, असे समीकरण झाले होते. त्याचवेळी भाजपच्या नेत्यांनी अजूनही काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांची नावे गुलदस्त्यातच ठेवली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहिले. मध्यंतरी शहरातील काही विषयांवरून भाजप आणि सत्ताधारी गटातील नगरसेवकांत खडाजंगी व आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा सूत जुळवून आणण्यास सुरवात करण्यात आली असल्याचे दिसते. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याला अधिक महत्त्व आले आहे. चारच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी पालिकेला दिलेल्या निधीतून झालेल्या कामांचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यातच महसूलमंत्र्यांनी जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी हजेरी लावल्याने नागरिकांना चर्चेसाठी आयती फोडणी पडली आहे. चंद्रकांतदादांच्या स्वागतासाठी भाजपच्या नगरसेवकांसह राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे चिटणीस अतुल भोसले, नगराध्यक्षा शिंदे, ‘जनशक्ती’चे नेते राजेंद्र यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. भोजनामुळे प्रीतिसंगमी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

‘स्वीकृत’च्या नावावर शिक्कामोर्तब?
सध्या पालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा विषय चर्चेत आहे. पालिकेत भाजपकडून देण्यात येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकासाठी पक्षातील काहींची नावे चर्चेत आहेत. चंद्रकांतदादांच्या दौऱ्यात भाजकडून देण्यात येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या नावांवरही शिक्कामोर्तब झाल्याबाबत चर्चा सुरू आहे. 

Web Title: karad municipal politics