विसंवादामुळे रखडली कऱ्हाडची सभा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कऱ्हाड - प्रत्येक महिन्याला पालिकेची मासिक सभा व्हायला हवी, अशी कायदेशीर तरतूद आहे. मात्र, येथील पालिकेची मासिक सभा दीड महिन्यापासून रखडली आहे. भाजपसह "जनशक्ती'च्या नगरसेवकांचा समन्वय नसल्यामुळे ही सभा रखडल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष अन्‌ अन्य नगरसेवकही त्याबाबत काहीही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा अबोला पालिकेत सारं काही अलबेल असल्याचेच भासवून जातो. विरोधी लोकशाही आघाडीने मात्र वेळच्या वेळी सभा होत नाहीत. त्या प्रत्येक महिन्याला व्हाव्यात, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालिकेच्या दीड महिन्यापासून रखडलेल्या सभेमागचे नेमके सत्य काय, याची उत्सुकता लागून आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

येथील पालिकेची मागील सभा 16 ऑक्‍टोबरला झाली होती. त्यामध्ये 53 विषयांना मंजुरी मिळालेली होती. त्यानंतर दोन विशेष सभा झाल्या आहेत. मात्र, मासिक सभा झाली नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. सत्ताधारी भाजप, नगराध्यक्षा व जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांचा खटका उडाल्याने ती सभा झालेली नाही, अशी चर्चा आहे. त्याबाबत कोणीच लोकप्रतिनिधी काहीही बोलण्यास तयार नाही. काहीजण तर पालिकेत येण्याचेच टाळत असल्याचे दिसते. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांतील वादाचा परिणाम सभा रखडण्यावर होत आहे. त्याचा कोठेतरी मेळ घालण्याचे काम मुख्याधिकारी यशवंत डांगे करत आहेत. मात्र, त्यांनाही अपेक्षित यश येत नसल्याचे दिसते. नगरसेवकांत समन्वयचा अभाव असल्याने सभा रखडली आहे. ती वेळेत व्हावी, यासाठी लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील प्रयत्नशील आहेत. सभा वेळेत व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. वास्तविक भाजप सत्तेत आहे. त्याशिवाय जनशक्ती आघाडीचीही भाजपशी सलगी वाढली आहे. अशा स्थितीत सभा वेळच्या वेळी होणे गरजेचे आहे. मात्र, त्याचे उलट परिणाम दिसून येताना दिसत आहेत. दीड महिन्यापासून सभा रखडली असल्याने अनेक महत्त्वाचे विषय मंजुरीविना रखडले आहेत. 

""शहरातील विकासाचे विषय नेमकेपणाने चर्चेत यावेत, यासाठी पालिकेची प्रत्येक महिन्यास नियमित सभा झालीच पाहिजे. नेमक्‍या विषयांची माहिती, त्याचा अजेंडा प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे.'' 
- सौरभ पाटील,  विरोधी पक्षनेते, कऱ्हाड पालिका 

""मध्यंतरी दोन विशेष सभा झाल्या आहेत. मासिक बैठक घेण्याचे नियोजनही सुरू आहे. सर्वांशी चर्चा करून त्याचे विषय ठरवले जात आहेत. त्याची पूर्तता होऊन मासिक सभा लवकरच घेतली जाईल.'' 
- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड पालिका 

""पालिकेची मासिक सभा रखडली आहे. त्यात काही विषय आहेत. त्याची चर्चा करून ते विषय मासिक सभेत घेतले जातील. त्यामुळे लवकरच पालिकेची मासिक सभेची तारीख ठरवली जाईल.'' 
- यशवंत डांगे,  मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका

Web Title: karad nagarpalika meeting stop