‘आधार कार्ड’चा सर्व्हरच डाउन! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

कऱ्हाड - सक्तीचे केल्याने सध्या बहुतांश जणांनी आधार कार्ड काढली आहेत. सध्या खासगी ठिकाणी आधार कार्ड काढण्याठी गेल्यावर तेथील सर्व्हर डाउन आहे, सध्या आधार कार्ड काढणे थांबवायला सांगितले आहे असे सांगितले जात आहे. शासकीय कार्यालयातही ही प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून शासनाकडूनची ही प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र म्हणून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाने सर्व बाबींसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी धडक मोहीम राबवून ९० टक्‍क्‍यांहून अधिक जणांची आधार कार्ड काढण्यात आली. त्यासाठी शासनाने तहसील कार्यालय, महा-ई सेवा केंद्रांत सोय केली होती. मात्र, अजूनही ग्रामीण भागातील, अशिक्षित, वाडी-वस्तीवर राहणाऱ्या अनेकांची आधार कार्ड काढलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सध्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर बॅंकेतील व्यवहारही करता येत नाहीत. त्यामुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. सध्या आधार कार्ड काढण्यासाठी संबंधित ठिकाणी गेल्यावर ‘सर्व्हर डाउन आहे’, ‘सध्या आधार कार्ड काढणे थांबवायला सांगितले आहे’, असे सांगितले जात आहे. त्यातच शासकीय कार्यालयातही ही प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे संबंधितांना हताश होवून घरी परतावे लागत आहे. आधार कार्ड नसल्याने सर्व व्यवहार थांबल्याने अडचणी निर्माण होत आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे 
आधार कार्ड काढण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक जण कुटुंबीयांसह हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यांना तेथे कार्ड काढण्याचे थांबवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व्हर डाउन आहे, असेही तांत्रिक कारण सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधितांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तहसील कार्यालयात आधार कार्ड काढण्याची सुविधा सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी संबंधितांकडून होत आहे. 

Web Title: karad news aadhar card