कऱ्हाडला अमोनिया सिलिंडरचा स्फोट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कऱ्हाड - पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत येथील पंकज हॉटेलसमोर आज 120 किलो क्षमतेच्या अमोनिया सिलिंडचा स्फोट झाला. स्फोटानंतर झालेल्या वायू गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. 

येथील पंकज हॉटेलसमोर रणजित घोरपडे यांचे अमोनिया गॅसचे सुमारे 20 सिलिंडर आहेत. तेथील इमारतीतही काही सिलिंडर आहेत. त्यातील 11 भरलेले तर नऊ रिकामे होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यातील एका सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटात सिलिंडरचे झाकण सुमारे 30 फुटांवर शेतात, तर सिलिंडरही काही अंतरावर फेकले गेले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे त्यातील एका सिलिंडरमधूनही अमोनियाची गळती सुरू झाली. परिसरात उग्र वास पसरला. तेथे येणे- जाणेही मुश्‍कील झाले. लगतच गॅरेज आहे; पण आज बंद होते. त्यामुळे वर्दळ नव्हती. परिणामी दुर्घटना घडली नाही. काही अंतरावर पेट्रोल पंप, तसेच राष्ट्रीय महामार्ग आहे. सुदैवाने स्फोटातील सिलिंडर थोड्याच अंतरावर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाने गॅस गळतीवर नियंत्रण मिळविले. दलाचे प्रमुख आनंद माने, अनिल डुबल यांनी पुढाकार घेतला.

Web Title: karad news Ammonia Cylinder Blast