अतुल भोसले यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

कऱ्हाड - पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या संदर्भातील अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने जारी झाला आहे. श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

आषाढी यात्रेच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले यांची राज्य शासनाने पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर भोसले यांनी पंढरपूर हे देशातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार जाहीर केला. श्री. भोसले यांच्या या कार्याची दखल घेत आणि त्यांना मंदिराचा अधिकाधिक विकास करता यावा, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. 

Web Title: karad news Atul Bhosale status as state minister