कऱ्हाडला "ब्लॅकमेलिंग'चे प्रकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

कऱ्हाड - शहर व परिसरातील काही जणांनी वेगवेगळ्या संघटनांच्या नावाखाली लुटीचे प्रकार सुरू केले आहेत. शासकीय अधिकारी, बांधकाम, अन्य व्यावसायिक, काही प्रतिष्ठितांना अमुकतमुक संघटनेचा पदाधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळण्याचे धंदे सर्रास सुरू आहेत. त्यातील काही कृष्णकृत्ये सध्या बाहेर येऊ लागली आहेत. अशा "ब्लॅकमेलिंग' करणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कमी कालावधीत जास्त पैसे मिळावेत, या हव्यासापोटी काही जणांनी आता "ब्लॅकमेलिंग'चा फंडा अंगीकारण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी काही संघटनांच्या पदांचा राजरोसपणे वापर केला जात आहे. कधी तक्रारी करून, कधी काही तरी आमिष दाखवून, कधी भीती दाखवून वेगवेगळे अधिकारी आणि व्यावसायिकांना लुटण्याचे प्रकार काही जणांकडून सुरू आहेत. त्यात पैसे मिळवणे एवढाच काही जणांनी धंदा सुरू केला आहे. मध्यंतरी एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून एकाने वाळूचा ट्रॅक्‍टर अडवून 50 हजार रुपयांची मागणी केली. त्याचबरोबर अन्यही असे प्रकार सातत्याने कऱ्हाड व परिसरात घडत आहेत. त्यासंदर्भात काही ठिकाणी ग्रामपंचायती, काही संस्थांना त्रास देवून त्यांच्याकडूनही पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. ज्यांच्यावर अशा प्रकारे आर्थिक भुर्दंड लादला गेला, त्यांनी तक्रार देण्याचे धाडस दाखवल्यामुळे अशी कृष्णकृत्ये सध्या बाहेर येऊ लागली आहेत. काही लोक मूग गिळून असे प्रकार सहन करत आहेत. मात्र, अशा संघटनांच्या नावाखाली "ब्लॅकमेलिंग' करणाऱ्यांना चाप लावण्याची नितांत आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर संघटनेच्या अध्यक्षांनाही आपले पदाधिकारी काय उद्योग करतात, याची तपासणी करून खातरजमा करण्याची गरज आहे. 

तहसील कार्यालयातही "ब्लॅकमेलिंग' 

तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेतून शिधापत्रिका काढून देणे, 
शिधापत्रिकेतून नावे कमी करणे, वाढवणे यांसह अन्य काही कामे केली जातात. मात्र, ती वेळेत का केली नाहीत, शिधापत्रिका काढून का दिली नाही, यासह अन्य प्रश्नांचा भडीमार करून तेथील कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचेही प्रकार घडले आहेत. 

Web Title: karad news Blackmailing crime

टॅग्स