कऱ्हाडला जूनअखेर पूलदुरुस्तीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

कऱ्हाड - येथील जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. मात्र, त्या कामाला गती नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्या पुलावरून चारचाकी घेऊन जाण्याचे कऱ्हाडकरांचे स्वप्न काहीकाळ लांबणार आहे. त्यामुळे पूल दुरुस्तीचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हानच बांधकाम विभागापुढे आहे. 

दळणवळणासाठी ब्रिटिशांनी तयार केलेल्या कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या पुलाला शंभरहून अधिक वर्षे झाल्याने तो पूल वाहतुकीस बंद करावा, असे पत्र ब्रिटिशांनी पाठवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीची गरज होती. त्या पुलाला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना निधीची तरतूद  केली होती. 

मात्र, त्या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी बराच कालावधी लागला. त्या पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. त्या पुलाच्या कामामुळे त्यावरून सुरू असलेली दुचाकीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना पुणे- बंगळूर महामार्गावरील नवीन पुलावरून जावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित जुन्या कोयना पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या पुलावरून हलक्‍या स्वरूपाच्या चारचाकी आणि दुचाकीची ये- जा होऊ शकते. 

पाण्याचीही अडचण 
टेंभू योजनेसाठी सध्या कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात येत आहे. त्याची फुगी येऊन कोयना नदीचेही पाणी साठून राहात आहे. त्यामुळे जुन्या कोयना पुलाखाली पाणी साचत असल्याने कामगारांना पूल दुरुस्तीचे काम करताना अडचण येत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेही काम लांबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: karad news Bridge repairs by the end of June