बदनामीच्या भीतीने मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड - विनयभंग करणारा तरुण आपली बदनामी करेल, या भीतीने चौदा वर्षीय शालेय मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथे घडली. संबंधित मुलगी नववीत शिकते. काल रात्री घडलेली ही घटना आज तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आली. सलीम वजीर मुलाणी (वय 25, रा. कऱ्हाड) या युवकाने दोन दिवसांपूर्वी तिचा विनयभंग केला होता. त्याच तणावातून तिने काल रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी सांगितले, की ही मुलगी शाळेत जात असताना सलीमने तिला अडवले. तिचा हात धरून "तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर तुझी बदनामी करेन,' अशी धमकी दिली. त्यानंतर दोन दिवस ती मुलगी तणावाखाली होती. काल तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उलट्या होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांकडे तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी सलिमला अटक केली आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही मुलींची छेडछाड करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे. त्यानुसार निर्भया पथकानेही त्याच्यावर कारवाई केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: karad news crime girl's suicide