रुग्णसेवेमुळे डॉक्‍टरांची दमछाक! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कऱ्हाड - आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना डॉक्‍टरांचीच दमछाक होत असल्याचे कऱ्हाड तालुक्‍यात दिसत आहे. तालुक्‍यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ६४ आरोग्य उपकेंद्रांमार्फत रुग्णांना सेवा देण्यासाठी २२ डॉक्‍टर आणि २१७ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, तालुक्‍यात डॉक्‍टरांची आठ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची ३८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे डॉक्‍टरांना साप्ताहिक सुटीही मिळणे मुश्‍कील बनले असून उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरोग्य सेवा सुरू आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणासाठी कऱ्हाड तालुक्‍यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ६४ आरोग्य उपकेंद्रांचा कारभार सुरू आहे. त्यामार्फत अगदी वाडी-वस्तीवरीलही रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू आहे. मात्र, सेवा देत असताना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मर्यादा येत आहेत. तालुक्‍यात २२ डॉक्‍टरांची पदे मंजूर आहेत. एका डॉक्‍टरने १२ तास सेवा करावी असे शासनाचे संकेत आहेत. त्यामधून आरोग्य केंद्रे २४ तास सुरू राहावीत असे सूचीत करण्यात आले आहे. असे असतानाही तालुक्‍यात सध्या डॉक्‍टरांची आठ आणि कर्मचाऱ्यांची ३८ पदे रिक्त आहेत. गेले काही महिने ती भरलीच गेली नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण येत आहे. त्यामुळे एका आरोग्य कर्मचाऱ्याकडे चार ते पाच गावांचा कारभार पाहण्याची वेळ आली आहे. तीच स्थिती डॉक्‍टरांचीही झाली आहे. सध्या सुपने, इंदोली, हेळगाव, वडगाव हवेली, येवती, कोळे आरोग्य केंद्रे एकाच डॉक्‍टरवर सुरू आहेत. तेथील डॉक्‍टरांना सुटी किंवा रजा पाहिजे असल्यास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दुसऱ्या आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांना तेथे पाठवावे लागते. मात्र, त्यासाठी तेथील आरोग्य केंद्रांचे कामकाज बंद पडणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागते. सध्या कऱ्हाड तालुक्‍यात डॉक्‍टरांबाबतीत अशी तारेवरची कसरत सुरू आहे. 

कऱ्हाड तालुक्‍यात ११ आरोग्य केंद्रांना २२ डॉक्‍टरांची गरज आहे. मात्र, सध्या आठ डॉक्‍टरांची पदे रिक्त आहेत. १४ डॉक्‍टरांवरच आरोग्य केंद्रांचा कारभार सुरू आहे. रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येतो.
-डॉ. सुनील कोरबू, तालुका आरोग्य अधिकारी, कऱ्हाड

Web Title: karad news doctor hospital